market decorated with sky lanterns for Deepotsav esakal
नाशिक

दीपोत्सवासाठी आकाशकंदील अन् पणत्यांनी सजली बाजारपेठ!

योगेश बच्छाव

सोयगाव (जि. नाशिक) : प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. शहरात वेगवेगळ्या रंगांचे आकाशकंदील, पणत्या, रोषणाईचा माळ्या, दाराचे रंगीबेरंगी तोरण, मुलांची खेळणी, वस्तू, महालक्ष्मीच्या मूर्ती, छायाचित्र अशा वस्तूंसह किराणा व कापड बाजार फुलला आहे. किमती वाढूनही बाजारात गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीच्या खरेदीची धूम अजून सुरू झाली नसली तरी किराणा व कापड बाजारात चांगली गर्दी दिसत आहे. यंदा या सर्व वस्तूंच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.

किमती वाढल्या तरीही ग्राहकांची गर्दी

शहरातील संगमेश्‍वर, मौसम चौक, सोयगाव मार्केट आदी भागातील दुकाने सजली आहेत. यंदा त्यात प्लास्टिक व कापडी आकाशकंदिल यांना चांगलीच मागणी आहे. त्यामुळे कागदाचे आकाशकंदील, हाताने बनविण्यात येणारे आकाशकंदील मागे पडले आहेत. १०० ते १००० रुपयांपर्यंत आकाशकंदील व पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंत कागदाचे आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लाईटच्या माळांनाही मागणी आहे. ६० ते ७०० रुपयांपर्यंतच्या लाईटच्या माळा बाजारात उपलब्ध आहेत. दरवाजांसाठीच्या रंगीबेरंगी तोरणांच्या किमतीत वाढ झाली आहे. कुटुंबियांची बाजारात लगबग सुरू आहे.
यंदा चांगल्या पावसामुळे दिवाळीत उत्साह आहे. लहान मुलांना तयार कपडे घेण्यासाठी गर्दी होईल, या हिशेबाने सर्वच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची साठवण करून ठेवली आहे. फटाक्यांच्या स्टॉलसाठी जागा आरक्षित केली जात आहे. आणखी चार - पाच दिवसांत विक्रीला सुरवात होईल.

मातीच्या तसेच, चिनी मातीच्या आकर्षक पण त्यांच्या किमती यंदा दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षिला जात आहे.

पणत्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ

मातीच्या तसेच, चिनी मातीच्या आकर्षक पण त्यांच्या किमती यंदा दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षिला जात आहे. नक्षीकाम केलेल्या मातीच्या पणत्या ६० रुपये डझन, चिनी मातीच्या ७२ रुपये डझन, तर साध्या २४ रुपये डझनने मिळत आहेत.

''यंदा कापडी आकाशकंदील, लाइट माळ, रंगीबेरंगी तोरण यांना चांगली मागणी आहे. वस्तुंच्या किमती वाढल्या असल्या तरी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. वस्तूंना ग्रामीण भागातही पसंती दिली जात आहे.'' - अल्पेश जैन, पंचदीप स्टोअर्स, संगमेश्‍वर

''नक्षीकाम केलेल्या व चिनी मातीच्या पणत्या उपलब्ध आहेत. चिनी मातीच्या तुलनेत नक्षीकाम केलेल्या पण त्यांना जास्त मागणी आहे. मात्र, किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.'' - शत्रुघ्न साहू, पणती विक्रेते, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT