A poster of a rap song introducing Malegaon esakal
नाशिक

Malegaon Rap Song : मालेगावची ओळख सांगणाऱ्या रॅप सॉंगची धूम; महिलांसाठी खास निर्मिती

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : आपल्या गावाची व शहराची महती समाजासमोर यावी ही अनेकांची प्रामाणिक भूमिका असते. देशभरात मालेगावची वेगवेगळ्या पातळीवर ओळख असली तरी इथल्या कमी बजेटच्या 'मॉलिवूडची' अलग झलक असते.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गीतकार तुषार शिल्लक यांनी आपल्याच शब्दांना साज देऊन 'रॅप सॉंग' निर्माण केले आहे. खास महिलांसाठी बनवलेल्या या रॅप सॉंगने मालेगाव शहर व कसमादेत जोरदार धूम करीत आहे. (Malegaon Rap Song that tells identity of Malegaon Specially designed for women nashik news)

आजकालच्या तरूणाईला सर्वत्र पाश्चिमात्य संगीताचं वेड आहे. तरूण पिढीची आवडी निवडी लक्षात घेऊन गतवर्षी पहिल्यांदा 'आमचे मालेगाव' या रॅप सॉंगला भन्नाट प्रतिसाद मिळाला. रसिक प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव तीन व्यक्ती प्रॉडक्शनने 'मालेगाव रॅप-२' या सॉंगला लॉन्च केले.

तरुणांमध्ये सध्या वेस्टर्न संगीत, गाणांची क्रेझ असल्याने शहरातील स्थानिक नवोदित कलाकारांना एकत्र आणून हे गीत बनवले. मालेगावची ओळख देताना येथील महिलांचे कार्य कर्तृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.शहर व तालुक्यातील महत्त्वाची ठिकाणे या गीतात अंतर्भूत असून रॅप सॉंग असले तरी मालेगावकर म्हणून सर्वांच्या पसंतीस उतरले आहे.

सदर रॅपची निर्मिती, संकल्पना व दिग्दर्शन तुषार शिल्लक यांनी केले असून हे गीत प्रियांका सोनार व हर्षाली बत्तीसे यांनी गायलेले आहे. यामध्ये कुणाल मोरे, सुरेंद्र दळवी, पलश जाधव, रश्मी अहिरे, काजल पवार, प्राजक्ता कुलकर्णी, अंजली जाधव, गीतांजली पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एस. डी. म्युझिकचे संगीत तसेच एस.पी. फोटोग्राफिक्सचे तंत्रनिर्देशन केलेले आहे. 'मालेगाव माझा' या युट्यूब चॅनेलवर सदर रॅप आपण बघू शकतो.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

"जगभर सर्वदूर सहजगत्या मालेगावची ओळख या गीतातून होईल. नवीन पिढीला बदलत्या मालेगावची ओळख, इथली संस्कृती व माणसं समजतील. साँगच्या माध्यमातून मालेगाव शहरासह तालुक्याला ओळख देणारी प्रसिद्ध ठिकाणे, शिक्षण, उद्योग क्षेत्रासह ऐतिहासिकता या महत्त्वाच्या बाबी यात घेतल्या आहेत. प्रत्येक मालेगावकर यांनी रॅप सॉंग आवर्जून बघावे ही अपेक्षा." - तुषार शिल्लक, गीतकार, मालेगाव

"हॉलिवूड - बॉलिवूडच्या धर्तीवर मालेगावचे मॉलिवूड सर्वदूर पोहचले आहे. येथील हरहुन्नरी कलाकारांमुळे शहराची ओळख जगाला होत आहे. गेल्या वर्षीही लोकांना रॅप सॉंग खूप आवडले. साहित्य, सांस्कृतिक वलयासह महिलांच्या कार्याची झळाळी यंदाच्या गाण्यात आहे."

- संजय फतनानी, उद्योजक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT