chhagan bhujbal.jpg 
नाशिक

भुजबळ म्हणताएत...'रमजानपूर्वी कोरोना हद्दपार करण्याचा संकल्प करूया'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी गांभीर्य ओळखून स्वत:हून पुढे यावे व तपासण्या करून घ्याव्यात. जिवापेक्षा बहुमूल्य काहीच नाही, अशी भावनिक साद घालतानाच, रमजानपूर्वी कोरोना हद्दपार करण्याचा संकल्प करू या. कोरोनाबाधित क्षेत्रांना अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 13) दिली. 

स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा

श्री. भुजबळ म्हणाले, की या आपत्तीत केंद्र व राज्य शासनातर्फे तातडीने उपाययोजना केल्याने यावर मात करण्यात यश येत आहे. प्रशासनाच्या कामाला नागरिकांचा प्रतिसाद आवश्‍यक आहे. आपण मंदिर, मशिदीतील पूजा थांबविल्या. त्याचप्रमाणे नागरिकांचा संचार असलेल्या सामाजिक प्रथा थांबविल्या पाहिजेत. प्रशासनाने सुरू केलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्वेक्षणाला गैरसमजामुळे प्रतिसाद मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. याकामी स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. प्रशासनाला स्वयंसेवक उपलब्ध करून द्यावेत. 
 
कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही : भुसे 

कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. आपत्कालीन परिस्थितीत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. लॉकडाउन (संचारबंदी)च्या काळात नागरिकांचा मुक्तसंचार ही चिंतेची बाब आहे. त्याला वेळीच आवर घालावा. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा, महाविद्यालये व खासगी रुग्णालये तत्काळ अधिग्रहीत करावीत. शहरात यंत्रमाग हा मोठा व्यवसाय आहे. येथील मजुरांना दम्यासारख्या आजाराने ग्रासले आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता असल्याने त्यांच्यावर वेळीच उपचार करून, या आजारावर मात करणे शक्‍य असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. 

थर्मल स्क्रीनिंगची यंत्रणा 

बैठकीत सर्व विभागप्रमुखांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा दिला. श्री. माने म्हणाले, की प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व्हेसोबत त्यांचे थर्मल स्क्रीनिंग केल्यास कामाला गती मिळेल. थर्मल स्क्रीनिंगची यंत्रणा लवकरच उपलब्ध होईल. सर्वेक्षणामुळे गैरसमज निर्माण झाला. या सर्व्हेचा एनआरसी व एनपीआरशी संबंध नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून द्यावे. यंत्रमाग बंदमुळे मजूर हवालदिल आहेत. त्यांना संपूर्ण वेतन व भत्ते अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व खासगी आस्थापनांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी.  

शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, माजी आमदार आसिफ शेख आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT