corona patient 123.jpg 
नाशिक

मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव  : मालेगावातून हृदयविकाराच्या उपचारासाठी नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयात आलेल्या 57 वर्षीय रुग्ण कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आला. नाशिकला उपचारासाठी गेलेला रुग्ण महिना उलटूनही घरी न परतल्याने कुटूंबियांनी व्हॉटसऍपवरून त्यांचा शोध सुरू केला...अन् मग...

असा घडला प्रकार

गेल्या महिन्यात मालेगावातील 57 वर्षीय इसम स्थानिक डॉक्‍टरांकडे वैद्यकीय उपचारासाठी गेले असता, त्यांना हृदयविकारासंदर्भात नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. हलाखीची परिस्थिती असतानाही अनवानी आणि सोबतीला कोणतीही नसताना, कुटूंबियांना फक्त नाशिकला जाऊन येतो असे सांगून निघाले. कसाबसा ते संदर्भ सेवा रुग्णालयात पोहोचले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केल्यानंतर या असे सांगितल्याने ते जिल्हा रुग्णालयात आले. कोरोनाची चाचणी केली असता, दोन दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना तात्काळ विशेष कोरोना कक्षात दाखल करून घेण्यात आले. त्यांच्याकडे संपर्कासाठीचे काहीही नव्हते. त्यामुळे त्यांना मालेगावात आपल्या कुटूंबियांशी संपर्कही साधता आला नाही. 

कुटुंबियांशी संपर्कच नाही 

तर, तिकडे मालेगावात कुटूंबिय महिना उलटून गेला तरीही नाशिकला गेलेला त्यांचा माणूस न परतल्याने हवालदिल झाले. शहरात कडेकोट लॉकडाऊनची स्थिती असल्याने शोध तरी कसा घ्यायचा असा प्रश्‍न उभा राहिला. अखेरिस कुटूंबियांनी त्यांचे छायाचित्र आणि त्याखाली बेपत्ता झाल्याचा मजकूराचा संदेश करून तो व्हॉटसऍपवरून व्हायरल केला. पाहता-पाहता तो व्हायरल संदेश नाशिकमध्ये पोहोचला. जुने नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते के. नज्मुल यांनी संदेशानुसार मालेगावातील काही समाजबांधवांशी संपर्क साधला. त्यावरून त्यांना काही माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी संदर्भ सेवा रुग्णालय आणि त्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. त्यावेळी त्यांना ते 57 वर्षीय इसम कोरोना कक्षात असल्याचे समजले. महिनाभरापासून याठिकाणी उपचार घेत असलेले आणि त्यांच्या कुटूंबियांची कोणतीही माहिती मिळत नसल्याने तेही मानसिकदृष्ट्या खालावले होते. के. नज्मुल यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना खाण्यापिण्यासह काही वस्तूंची खरेदी करून दिली. 

कुटूंबियांनी मानले आभार
त्यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना मालेगावी पोहोच करण्याचीही व्यवस्था करून दिली. महिनाभरापासून थांगपत्ता नसलेला आपला माणूस घरी परत आल्याचे पाहून कुटूंबियांनीही के. नज्मुल यांचे आभार मानले. तसेच कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातूनही ते मुक्त झाल्याचा कुटूंबियांनी आनंदही व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT