नाशिक

नाशिकमध्ये मॉल सुरु करण्यास परवानगी; दुपारी चारपर्यंत राहणार सुरु

विनोद बेदरकर

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असून, शॉपिंग मॉल सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.

नाशिक : नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झाला असला तरी, नाशिकला पूर्ण अनलॉक (Unlock) करता येणार नाही. येत्या सोमवार (ता.२१) पासून मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली असून, दुपारी चारपर्यत मॉल खुले राहतील. नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (malls will start from monday in nashik)

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणे, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, डॉ. आवेश पलोड, डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यात एकूण ६२ ऑक्सिजन प्रकल्पातून साधारण १५५ टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. ४०० टन ऑक्सिजन निर्माण करण्याचे नियोजन सुरू आहे. शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागांची कामे लवकर पूर्ण करावीत. दुसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये तयार झालेली प्रतिकार शक्ती तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, त्या अनुषंगाने आवश्यक असणारा औषधसाठा करण्याचे नियोजन करावे.

तिसऱ्या टप्यातील निर्बंध लागू

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असून, शॉपिंग मॉल सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. या मॉलमधील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असून, तेथील कर्मचाऱ्यांचे लवकर लसीकरण करावे. तसेच तेथे जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत होत आहे. महापालिका रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर तयार करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले. (malls will start from monday in nashik)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT