Nashik Crime News esakal
नाशिक

Crime : पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून करणारा जेरबंद

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : माडसांगवी माळवाडी शिवारात फावड्याच्या मागील लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून पत्नीचा खून (Murder) करणारा पतीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले आहे. (Arrest of a man who stabbed his wife in the head with a shovel Nashiik News)

विशाल राजाराम कापसे (३२ रा. माळवाडी, माडसांगवी), असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सुरवातीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तो अकस्मात मृत्यू नसून खून असून संशयित विशाल हा शासकीय रुग्णालय येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक विशाल देवरे यांनी मिळाली. सदर माहिती वरिष्ठांना कळविली. संशयित विशाल कापसे हा शासकीय रुग्णालयाच्या गेट जवळून पळून जात असताना गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाझीम पठाण, आसिफ तांबोळी, पोलिस नाईक विशाल देवरे यांनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT