nurse.jpg 
नाशिक

ड्युटी संपवून आलेल्या महिला नर्सचा रिपोर्ट समजला...तेव्हा साऱ्यांनाच बसला धक्का

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (चांदवड) तालुक्यातील दहेगाव मनमाड येथील रहिवासी असलेले 60 वर्षीय पुरुष व चांदवडच्या कोविड हेल्थ सेंटर येथे कार्यरत असलेल्या सद्या चांदवड येथील ड्युटी संपवुन नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या एका नर्सचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील जनतेत पुन्हा चिंतेचे वातावरण झाले आहे.

सहकारी महिला नर्स यांचा अहवाल निगेटिव्ह

दहेगाव येथील रूग्णाला सर्दी व खोकला असल्याने मनमाड उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी भरती केले असता त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व त्यांची ऑक्सिजन मात्रा कमी झाल्याने त्यांना नाशिक सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील 6 व्यक्ति यांना काल शुक्रवार (ता. 5) नेमिनाथ येथील डी सी एच सी केंद्रात भरती करण्यात येऊन त्यांचे स्वॅब आज शनिवारी (ता. 6) घेण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहेत. चांदवड येथील नेमिनाथ मेडिकल कॉलेज येथे कार्यरत असलेल्या डी सी एच सी सेंटरमधील नर्स व कर्मचारी असे एकूण तीन जणांचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यांचे आज अहवाल प्राप्त झाले.

एकूण तीन जणांचे स्वॅब तपासणी

त्यापैकी एक 37 वर्षीय महिला नर्स पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांची ड्युटी रविवारी संपून त्यांना त्यांच्या सरकारी निवासस्थानी क्वारंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे कुटुंबीय नाशिक येथे राहतात. क्वारंटाईन कालावधीत त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत नव्हते. त्यांच्यासोबत क्वारंटाईन असलेल्या सहकारी महिला नर्स यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी तात्काळ दहेगाव येथे स्वत: उपस्थित राहुन वैद्यकीय पथकासह गावातील आरोग्याची पाहणी केली.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तालुक्या तील नागरिकांनी शासनाचे सर्व नियमांचे पालन करावे, अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरू नये, बाहेर जाताना मास्क वापरावा व सामाजिक अंतर तसेच भौतिक अंतर किमान एक मीटरचे ठेवावे, काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये असे आवाहन चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदिप पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT