crime sakal
नाशिक

जयपूरमध्ये झालेल्या तरुणीच्या हत्येचे गूढ उलगडले; मारेकरी अटकेत

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : जयपूरला फिरण्यासाठी आलेल्या तरुणीची सांगानेरमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली. झोयाचा मारेकरी तिचा पतीच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, बोढरी (ता. बागलाण) येथील महेश भास्कर ठाकरे (वय ३५) याला जायखेडा पोलिसांच्या मदतीने राजस्थान पोलिसांनी अटक केली. संशयित ठाकरे यास चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती राजस्थानचे एससीपी नेमिचंदजी यांनी दिली.

जयपूरमध्ये ३० वर्षीय झोया आसिफ मलिकच्या हत्या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. मूळ पुणे येथील रहिवासी असलेल्या झोया आसिफ मलिकचे २०२० मध्ये नाशिकच्या महेश भास्कर ठाकरे याच्याशी लग्न झाले होते. लग्नाआधीही दोघेही एकमेकांना जवळपास सहा वर्षांपासून ओळखत होते. पण, लग्नानंतर काही दिवसांनी झोया पश्‍चिम बंगालमध्ये राहणाऱ्या साहिलच्या प्रेमात पडली. लग्नानंतर झोया साहिलसोबत वेळ घालवू लागली. झोया नाशिकमधून पतीच्या घरातून बेपत्ता झाल्याने पतीनेही पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पती महेशला माहिती होते, की ती आपली मानलेली बहीण कुमकुम ऊर्फ ​​कामिनी हिच्या सतत संपर्कात राहायची आणि जयपूरला जायची. महेश कामिनीला झोयाबद्दल सतत विचारायचा. झोया दिल्लीहून जयपूरला आली तेव्हा महेशही जयपूरला आला. महेशने जयपूरमध्येच चाकू खरेदी केला होता. जयपूरमधील एका निर्जन ठिकाणी तिला गाठून महेशने झोयावर चाकूने हल्ला केला.

लोकेशनच्या आधारे शोध

घटनास्थळी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, हत्येवेळी महेशने चेहरा झाकून ठेवला होता. हत्येनंतर काही अंतरावर गेल्यावर त्याने अंगावरील कपडे काढून रस्त्यावर फेकले. मोबाईल लोकेशनच्या आधारे राजस्थान पोलिस थेट जयपूर, नाशिक व्हाया नामपूरपर्यंत मागावर होते. महेशचे काही महिन्यांपासून शिवमनगर परिसरात ओंकार मोबाईल रिपेअरिंग सेंटर नावाचे दुकान आहे. जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्याशी संपर्क साधून राजस्थान पोलिसांनी संशयिताला पकडण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर नामपूर दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी उमेश भदाणे व नानासाहेब पाटील यांनी अत्यंत चालाखीने शिवमनगर परिसरातून महेशला पकडण्यासाठी राजस्थान पोलिसांना मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT