Mangala gaur latest marathi news esakal
नाशिक

Nashik : चला गं... मंगळागौरीचा करूयात जागर !

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्रावण महिना म्‍हणजे सणाचा ओतप्रोत भरलेला खजिना. श्रावणात मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. ज्‍याप्रमाणे गौर म्‍हणजेच पार्वती हिने महादेवासाठी केलेले पूजन तसेच शिव व पार्वती हे आदर्शवत असणारी देवता त्‍याप्रमाणे पती- पत्‍नीमधील प्रेम व निष्‍ठेचे प्रतीक.

याप्रमाणे नवविवाहितेने आपल्‍या पतीसोबत, सासरच्या मंडळीसोबत जुळवून सुखाने संसार करावा. प्रेम व निष्‍ठा टिकून राहावी तसेच सौभाग्‍यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे कार्यक्रम पुढील आठवड्यापासून जोरात सुरू होणार आहे. (Mangalagaur events in full swing from next week nashik latest marathi news)

मंगळागौरीचे पूजन हे माहेरी व सासरी केले जाते. लेक व मुलाच्या सुखी संसारासाठी पूजन केले जाते. पूजेसाठी नवविवाहिता जमून पूजन करतात. पुरणाचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. पूजेसाठी किमान पाच व जास्‍तीत- जास्‍त अशा नवविवाहिता मिळून पूजा करतात.

संसाररूपी नौका तारून नेताना नातेसंबंधाची जपवणूक तसेच लग्‍नानंतर एकत्र येणारे दोन कुटुंबे यांचे स्‍नेहबंध अधिक प्रबळ होत असतात. माहेरवाशीणीची काढलेली खोडी, तिचे मैत्रिणींकडून होणारे कौतुक, गप्पागोष्‍टी यात माहेर- सासरची ओढ, मैत्रिणीसोबतची लाडिक, खेळ खेळून मंगळगौरीचे जागरण केले जाते.

मैत्रिणी रिंगण धरून झिम्मा खेळतात. वेगवेगळ्या खेळातून शारीरिक व्यायाम होतो. त्‍यामुळे आरोग्‍याची जपवणूकही होते. पूर्वीच्या महिला जिम वगैरे या गोष्‍टी नसून सुद्धा फिट होत्‍या, त्‍यांच्या आरोग्याचे रहस्‍य हे घरकाम जसे जात्‍यावर दळणे, ताक काढणे, तांदूळ सडणे आदींत दडलेले होते तेच मंगळागौरीचा खेळ खेळून मैत्रिणी समाजापुढे आणण्याचा प्रयत्‍न करत आहेत.

ताक करू ग सये !

ताकाला लोणी का ना ये !

ताक झाल झरा झरा !

ताकाच्या वाट्या भरा!

हे गाणे गाऊन एकीला मधोमध उभे करून ती रवीचे प्रतीक म्‍हणून व बाकीच्या मैत्रिणी लोणी घुसळतांना दाखवून त्‍यांचा होणारा व्यायाम यातून सर्वांग व्यायाम होत असताना दिसतो. तसेच खेळ पुन्हा, पुन्हा खेळावे वाटतात. आपल्‍या संस्‍कृती असलेले सण तसेच ते साजरे करण्याची पध्दत त्‍याचे फायदे या सर्व गोष्‍टीचा विचार करता संस्‍कृतीतला खजिना किती अगाध आहे, याचे महत्त्व पटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT