manmad senior citizen esakal
नाशिक

5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!

मनमाडच्या ब्याण्णव वर्षीय आजोबांचा असा लढा....

अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : पाचवेळा हृदयविकाराचा झटका, खुब्याची झालेली शस्त्रक्रिया, रक्तदाब, मधुमेह आणि वय वर्षे ९२... तरीही आत्मविश्‍वास इतका दृढ, की मनमाडच्या नामदेव शिंदे यांनी पॉझिटिव्ह संदेश दिला. आपल्याला वेगवेगळे आजार असतानाही केवळ इच्छाशक्ती व सकारात्मक विचारांच्या बळावरच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मनमाडच्या ब्याण्णव वर्षीय आजोबांचा असा लढा....

सध्या सर्वत्र कोरोनाने बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा बिकट काळातही एक आत्मविश्‍वासाचा किरण उभा केला आहे मनमाडच्या हुडको येथील ९२ वर्षीय नामदेव किसन शिंदे या ज्येष्ठ नागरिकाने. ३२ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९० मध्ये रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले श्री. शिंदे पेन्शनर आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना अशक्तपणा, ताप, सर्दी, खोकला, कफ अशी प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी डॉ. प्रवीण शिंगी यांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी केली. दुर्दैवाने त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी स्कोअरही १३ होता. मात्र, ते डगमगले नाहीत. न घाबरता योग्य उपचारासाठी ते तयार झाले. परिस्थिती खालावल्यामुळे नांदगाव येथील डीसीएचसी कोविड सेंटरमध्ये डॉ. रोहन बोरसे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांनी धीर ठेवत एकट्याने उपचार करून घेत औषधे घेतली व कोरोनाला पळवून लावले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले.

प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात

आपल्याला अनेक व्याधी असूनही केवळ प्रबळ इच्छाशक्ती, कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाल्यानेच आपण कोरोनावर यशस्वी मात केली. घाबरून न जाता सकारात्मक विचार ठेवले व डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे घेत दक्षता घेतली. न घाबरता कोरोनाचे नियम पाळा, मास्कचा नियमित वापर करा, कोरोना नक्की बरा होईल.

-नामदेव शिंदे, कोरोनायोद्धा, मनमाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT