Maratha Reservation Gram Panchayat Education Department found 8 thousand Kunbi records nashik news Sakal
नाशिक

Maratha Reservation: जिल्ह्यात 76 हजार कुणबी नोंदी; तपासणी मोहिमेत 39 लाख कागदपत्रांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कुणबी नोंदींचा शोध सुरू आहे. आजअखेर नाशिक जिल्ह्यात ७६ हजार ३५३ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

जिल्ह्यात १९४७ पूर्वीपासूनच्या नोंदी शोधल्या जात आहेत. त्यात १९६७ पर्यंतच्या जुन्या नोंदींचा शोध सुरू आहे. (Maratha Reservation 76 thousand 353 Kunbi records have been found in Nashik district news)

नाशिकला अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर, तर विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात प्रत्येक शासकीय विभागांना सामावून घेण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात १९४७ पूर्वीच्या आणि १९४८ ते आरक्षणाचा निकष असलेल्या १९६७ पर्यंतच्या अशा दोन पातळ्यांवरील नोंदी तपासल्या जात आहेत.

त्यात आतापर्यंत १९४७ पूर्वीच्या १६ लाख ७५ हजार ५८६ नोंदी तपासण्यात आल्या.

त्यात ५८ हजार ३५१ नोंदी कुणबी असल्याचे आढळले. १९४८ ते १९६७ दरम्यानच्या २३ लाख सहा हजार ७२८ नोंदी तपासण्यात आल्या. त्यात ५८ हजार ३९१ नोंदी कुणबी असल्याचे आढळले. जिल्हाभरात ३९ लाख ८२ हजार ३१४ नोंदी तपासल्यावर त्यात ७६ हजार ३५३ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT