Kunbi Certificate esakal
नाशिक

Kunbi Certificate: सिन्नरला 54 कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण; अध्यादेशानंतर कार्यवाहीला वेग

मराठा आरक्षण संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या व्यापक आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : मराठा आरक्षण संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या व्यापक आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला.

या पार्श्वभूमीवर येथे महसूल विभागामार्फत मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, अशा ५४ जात प्रमाणपत्रांचे प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. (Maratha Reservation Case Distribution of 54 Kunbi Caste Certificates to Sinners Speed ​​up proceedings after Ordinance nashik)

यासंदर्भाने तालुक्यात शिबिर घेतल्याची माहिती प्रांताधिकारी पाटील यांनी दिली. तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीसंदर्भात आढळून आलेल्या नोंदीच्या आधारे संबंधीत पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रांताधिकारी पाटील यांनी केल्या.

दरम्यान, ज्यांच्या कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, अशा नोंदी आढळल्या आहेत. त्या नागरिकांसाठी तलाठ्यांमार्फत गाव दवंडी देण्यात यावी. त्यानंतर प्रत्येक मंडल स्तरावर गावांमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.

मंडलाधिकारी व तलाठी यांनी संबंधित गावाचे महा ई सेवा केंद्र चालक, आपले सरकार केंद्र चालकांयाशी शिबिरापूर्वी संपर्क साधून त्यांच्यामार्फत विहीत नमुन्यात कुणबी जातीचे दाखल्यांचे प्रस्ताव महाऑनलाईन पोर्टलवर ऑनलाईन दाखल करावे व संबधित मंडलाधिकाऱ्यांनी नमुन्यात दाखल जात प्रमाणपत्रांबाबत दैनंदिन अहवाल सादर करावा, अशा सूचना तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केल्या.

मंडलाधिकारी अशोक शिलावटे, तलाठी स्वरुप गोराणे, सेतू व्यवस्थापक सतीश दळवी आदींनी जात प्रमाणपत्र वितरणासाठी परिश्रम घेतले. जात प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मंडलनिहाय जात प्रमाणपत्रांचे होणार वितरण

दरम्यान, महसूल विभागाने मंडलनिहाय जात प्रमाणपत्रांचे वितरणाचे नियोजन केले आहे. याबाबत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी संबंधितांना सूचना केली आहे.

सिन्नर, पांढुर्ली, सोनांबे, नायगाव, डुबेरे, गोंदे, नांदूरशिंगोटे, वावी, शहा, देवपूर, वडांगळी, पांगरी बुद्रुक आदी मंडलांमध्ये १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान ही शिबिरे होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT