In front of the Tehsil office, the protestors were sleeping on Monday mattresses and wearing garlands around their necks during the silent food sacrifice movement. esakal
नाशिक

Maratha Reservation: येवल्यात अन्नत्याग आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले

संतप्त आंदोलकांचा मका चाऱ्यावर गाद्यांचे सरण बनवत दिवसभर झोपून निषेध

सकाळ वृत्तसेवा

येवला : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयात ४२ दिवसांपासून ठिय्या आंदोलन, तर १६ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे सरणावर झोपून अन्नत्याग आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले.

मात्र माघार न घेता आंदोलनकर्त्यांनी जमिनीवर मका चारा टाकून त्यावर गाद्याचे सरण बनवत दिवसभर झोपून गळ्यात माळा घालत आंदोलन केले.

विशेष म्हणजे सकाळी सहापासून सायंकाळी सहापर्यंत आंदोलकानी पाणीत्याग करून मौन पाळत आंदोलन केले. (Maratha Reservation Food giving up movement in Yeola foiled by police nashik)

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या व अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ठिय्या, अन्नत्याग तसेच मुंडण व शासनाचे श्राद्ध आंदोलन केले.

सरणावर झोपून आंदोलनाचा आंदोलनकर्त्यांनी आजपासून इशारा दिला होता. अधिकाऱ्यांनी येऊन अग्निडाग देईपर्यंत आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला होता.

मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याने सोमवारी पहाटे सरण रचण्याची तयारी सुरू असताना शहर पोलिसांनी सरण रचण्यासाठी आणलेले लाकूड, चारा आदी साहित्य जप्त केले.

आंदोलक संजय सोमासे, निंबाजी फरताळे, विजय मोरे, गोरख संत, रवींद्र शेळके, जालिंदर मेंढकर, विष्णू चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाज आंदोलनावर ठाम असल्याने झोपण्याच्या गाद्यांचे सरण रचून आंदोलनाला सुरवात झाली.

दिवसभर या गाद्यांवर मौन पाळत व पाण्याचा त्याग करत आंदोलक गळ्यात माळा घालून सरणावर झोपल्यासारखे झोपून होते.

या आंदोलनाला शिवसेनेचे युवा नेते संभाजी पवार यांनी भेट देत आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच दिवसभर हजारावर विविध पदाधिकारी व समाज बांधवांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी देखील केली.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह येवला तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न यांसह इतर प्रश्न सोडवण्यात यावे या मागण्यांसाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत.

गाद्यांवर झोपून आंदोलनला सुरवात करण्यात आली आहे. या सरणाला अग्निडाग देण्यासाठी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी वेळ मिळेल तेव्हा यावे तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, अशी भूमिका तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांनी घेतली आहे.

"मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्याचे आता शासनाने थांबवून तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा. स्थानिक युवकांच्या हिताच्या मागण्यांचीही सोडवणूक करावी ही आमची मुख्य मागणी आहे. प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास यापुढे अधिक आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल." - संजय सोमासे, मुख्य आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT