MVP Institute's Adv. A captivating view of the magnificent Granth Rangoli executed in the premises of Baburao Ganpatrao Thackeray Engineering Ground. esakal
नाशिक

Shiv Mahotsav: शिवप्रतिमेची 17 हजार चौरस फुटांची ग्रंथ रांगोळी; मविप्रतर्फे शिव महोत्‍सवांतर्गत विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेतर्फे शिव महोत्‍सवाचे सोमवार (ता. २७)पासून १ डिसेंबरदरम्‍यान आयोजन केले आहे. त्याअंतर्गत ‘कुळवाडीभूषण शिवराय’ या ग्रंथापासून शिवप्रतिमेची विश्‍वविक्रमी ग्रंथ रांगोळी साकारली आहे. ही ग्रंथ रांगोळी विद्यार्थी, नाशिककरांना पाहाण्यासाठी खुली राहणार आहे.

तसेच यादरम्‍यान पुस्‍तक प्रकाशन, किल्‍ले बनवा, छत्रपती शिवराय शिष्यवृत्ती योजना असे विविध उपक्रम पार पडतील, अशी माहिती मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी मविप्र संस्‍थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वास मोरे, संचालक ॲड. संदीप गुळवे, विजय पगार आदी उपस्‍थित होते. (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha organizes Shiv Mahotsav from Monday 27 nov nashik news)

ॲड. ठाकरे म्‍हणाले, की गंगापूर रोडवरील मविप्र संस्‍थेच्‍या ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या मैदानावर ग्रंथ रांगोळी साकारली आहे. त्‍यासाठी श्रीकांत देशमुख लिखित ‘कुळवाडीभूषण शिवराय’ या ग्रंथाच्‍या विविध रंगांतील प्रतिंचा वापर केला आहे. प्रदर्शनाला भेट देण्यास येणाऱ्यांसाठी उंचीवरून शिवप्रतिमा पाहाण्यासाठीची व्‍यवस्‍था केलेली आहे. यानिमित्त विविध उपक्रम येत्‍या १ डिसेंबरपर्यंत पार पडतील.

पुस्‍तकाचे उद्या प्रकाशन

‘कुळवाडीभूषण शिवराय’ची पाचवी आवृत्ती मविप्र संस्‍थेच्‍या प्रिंटिंग विभागात छापण्यात आली आहे. या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सोमवारी (ता. २७) सायंकाळी पाचला मविप्र संस्‍थेच्‍या अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात पार पडेल. या कार्यक्रमास ‘एमकेसीएल’चे विवेक सावंत, ज्‍येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आदी मान्‍यवर उपस्‍थित राहातील.

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

प्रदर्शनानंतर सर्व ७५ हजार पुस्‍तकांचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल. वाचनसंस्‍कृती वृद्धिंगत व्‍हावी, यासाठी छत्रपती शिवराय शिष्यवृत्ती योजना राबविली जाईल. याअंतर्गत पुस्‍तकावर आधारित शालेय स्‍तरावरील परीक्षा घेतली जाईल. यातून शंभर विद्यार्थ्यांना प्रत्‍येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दर वर्षी ही योजना राबविण्याचा मानस ॲड. ठाकरे यांनी व्‍यक्‍त केला.

शिव महोत्‍सवातील ठळक बाबी

- ग्रंथ रांगोळीचा आकार १५२ फूट लांब, ११२ फूट रुंद

- ७५ हजार ग्रंथांचा वापर करून साकारली ग्रंथ रांगोळी

- १ डिसेंबरपर्यंत सायंकाळी पाच ते रात्री दहादरम्‍यान भेट देण्याची संधी

- प्रदर्शनस्‍थळी विद्यार्थ्यांनी साकारले ६६ गडकिल्‍ले

- गडकिल्ल्‍यांची आकर्षक सजावट ठरतेय लक्षवेधी

- आठवी ते दहावीच्‍या विद्यार्थ्यांचा सहभाग, स्‍पर्धेत देणार बक्षिसे

- शिवचरित्रावरील ठळक प्रसंगांची चित्र स्वरूपात मांडणी

- कलाशिक्षक, विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्‍या चित्रांचे प्रदर्शन

- शिवकालीन जतन केलेली नाणी (शिवराई) पाहता येणार

- शौर्याचे प्रतीक असलेली प्रतीकात्‍मक शिव तलवार बघण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

'केस नं ७३' मध्ये अमित शिंदे साकारणार 'ही' भूमिका; उलगडणार गूढ रहस्य

Makar Sankranti Sale : घाई करा! मकर संक्रांतीनिमित्त 'स्मार्ट बाजार'ला मोठी ऑफर; 'या' वस्तू झाल्या एकदम स्वस्त

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: मेष, कर्क अन् मकरसह 'या' राशीच्या लोकांना मिळेल त्रिग्रह योगाचा फायदा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT