marathi sahitya sammelan esakal
नाशिक

मराठी साहित्य संमेलन ऑनलाइन होणार? आयोजकांच्या भूमिकेकडे लक्ष

तुषार महाले


नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ३१ जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यात, यंदाचे संमेलन ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा विचार पुढे आला आहे. (Marathi Sahitya Sammelan it is being considered to be held online)


पूर्वनियोजनानुसार २६, २७ व २८ मार्चला नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होते; परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संमेलन स्थगित करावे लागले होते. आता जुलै महिना संपत आल्याने यापुढे संमेलन प्रलंबित ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आयोजक लोकहितवादी मंडळ व स्वागत मंडळाने याबाबत ३१ जुलैपर्यंत आपली भूमिका साहित्य महामंडळाला स्पष्टपणे कळवावी, असे पत्र ठाले पाटील यांनी दिले आहे. त्या अनुषंगाने रविवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यास १५ दिवसांत संमेलन घेण्याची आयोजकांची तयारी असल्याची बाब पुढे आली. मात्र दुपारी चारपर्यंतचे निर्बंध बघता आणि ५० पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीला परवानगी नसताना संमेलन घेणे कठीण आहे. त्यामुळे आयोजकांकडून आता संमेलन ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा विचार असल्याचे समजते. मात्र, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी आधीच ऑनलाइन संमेलनाला नकार दिलेला आहे. त्यामुळे आयोजक याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


साहित्य संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकहितवादी मंडळातर्फे मंगळवारी (ता. २७) सायंकाळी पाचला नाशिकमधील साहित्य संस्थांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. संमेलनाचे कार्यालय असलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ही बैठक होईल. नाशिकमधील साहित्य संस्थांनी हे संमेलन नाशिकमध्येच होणे गरजेचे असल्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे, तसेच लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशीही चर्चा करणार आहेत. त्यानंतर गुरुवारी (ता. २९) संमेलनाच्या समन्वयकांसमवेत बैठक होणार असल्याचे समजते.


(Marathi Sahitya Sammelan it is being considered to be held online)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT