election news  esakal
नाशिक

Market Committee Election : नाशिक बाजार समितीत 18 जागांसाठी 175 अर्ज

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सोमवारी (ता. ३) एकूण ९० अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात ५०, ग्रामपंचायत मतदारसंघ ३०, तर व्यापारी मतदारसंघातील दहा अर्जांचा समावेश आहे. (Market Committee Election 175 applications for 18 seats in Nashik Market Committee)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

दरम्यान, हमाल मापारी गटातून एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत १८ जागांसाठी एकूण १७५ अर्ज दाखल झाले असून, हमाल मापारी गटातून एकाच उमेदवाराचे तीन अर्ज आलेले आहेत.

बुधवारी (ता. ५) छाननी होणार असून, अर्ज मागे घेण्याची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतरच पॅनलनिर्मिती अन्‌ प्रचाराला वेग येणार आहे. माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे, बबन घोलप, विजय करंजकर यांच्याविरुद्ध खासदार हेमंत गोडसे, शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील यांच्या पॅनलमध्ये लढत होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT