market committee elections esakal
नाशिक

Market Committee Election : मालेगावला 18 जागांसाठी 202 उमेदवारी अर्ज; तिसऱ्या पॅनलची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदती अखेर एकूण २०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (ता.३) शेवटचा दिवस असल्याने बहुसंख्य इच्छुक उमेदवारांनी आपापल्या समर्थक व गटांसह शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी दोनशेहून अधिक अर्ज दाखल झाल्याने नेत्यांसाठी पॅनल निर्मिती डोकेदुखी ठरणार आहे. (Market Committee Election 202 nominations for 18 seats in Malegaon nashik news)

बाजार समितीच्या १८ जागांमध्ये ग्रामपंचायत गटात एकूण ४ जागा आहेत. यातील दोन सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दुर्बल घटकासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित असणार आहे. ग्रामपंचायत गटात १ हजार २३२ मतदार आहेत. चार जागांसाठी ६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सोसायटी गटातून सर्वाधिक ११ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यात ७ सर्वसाधारण, २ महिला राखीव, १ इतर मागासवर्गीय व १ जागा भटक्या जाती विमुक्त जमातीसाठी आहे. सोसायटी गटात १ हजार ५६८ मतदार आहेत. सोसायटी गटासाठी ११९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. व्यापारी गटात दोन जागा असून एकूण १ हजार १२५ मतदार आहेत.

व्यापारी गटात १६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. हमाल मापारी गटात १ जागा आहे. या गटात सर्वात कमी २६२ मतदार असून ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता.३) अखेरचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल करतील हा अंदाज लक्षात घेऊन तीन टेबल वाढविण्यात आले होते. श्री. शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या देखरेखीत अर्ज दाखल करण्यात आले. यापूर्वी पाच दिवसात ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज दिवसभरात १५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

तिसऱ्या पॅनलची शक्यता

या निवडणुकीत प्रामुख्याने पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत होईल. प्रारंभी दोन पॅनल अपेक्षित आहेत. मात्र इच्छुकांची संख्या पाहता ऐनवेळी तिसरे पॅनलही आकाराला येऊ शकते.

गेल्या वेळी बाजार समिती निवडणुकीत तीन पॅनल होते. २० एप्रिलला अर्ज माघारीची अंतिम मुदत असून याचवेळी दोन्ही पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT