On the day of election retreat of Deola Agricultural Produce Market Committee, candidates and activists gathered in the premises of the market committee.
On the day of election retreat of Deola Agricultural Produce Market Committee, candidates and activists gathered in the premises of the market committee. esakal
नाशिक

Market Committee Election : देवळा बाजार समितीत 10 जागांसाठी निवडणूक; 103 उमेदवारांची माघारी

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : बिनविरोध निवडीच्या मार्गावर असलेली देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक ५० टक्के बिनविरोध झाली. या निवडणुकीच्या माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी (ता.२०) रोजी १०३ माघारी झाल्याने एकूण १८ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित दहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. (Market Committee Election Election for 10 seats in Devla Market Committee Withdrawal of 103 candidates nashik news)

देवळा बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध होणेकामी देवळा पत्रकार संघाने प्रयत्न केले. मात्र त्यास यश आले नाही. काही जागांचा तिढा न सुटल्याने १० जागांसाठी निवडणूक लागली. यात बाजार समितीच्या सर्वसाधारण सोसायटी गटाच्या सात जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तसेच व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी तीन व हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.

सोसायटी सहकारी संस्थेच्या मतदारसंघात महिला राखीव जागेवर धनश्री आहेर व विशाखा पवार यांची तसेच इतर मागास वर्ग गटात दिलीप पाटील आणि विजा-भज मध्ये दीपक बच्छाव यांची बिनविरोध निवड झाली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

याशिवाय ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा बिनविरोध झाल्या. यात सर्वसाधारणमध्ये रेश्मा महाजन व शाहू शिरसाठ, अनुसूचित जाती व जमातीमध्ये भास्कर माळी तर आर्थिक दुर्बल गटात शीतल गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक लागलेल्या सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यात अरुण आहिरे, शिवाजी आहिरे, महेंद्र आहेर, योगेश आहेर, अभिजित निकम, शशिकांत निकम, पोपट पगार, भाऊसाहेब पगार, अभिमन पवार, शिवाजीराव पवार, कडू भदाणे, वसंत सूर्यवंशी, विजय सोनवणे यांचा समावेश आहे. तर व्यापारी गटातील दोन जागांसाठी अमोल आहेर, निंबा धामणे, संजय शिंदे आणि हमाल-मापारी गटाच्या एका जागेसाठी विजय आहेर व भावराव नवले समोरासमोर लढणार आहेत.

२८ एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे देवळा तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT