election esakal
नाशिक

Nashik Market Committee Election : सत्ताधाऱ्यांना कौल तर दिंडोरीत परिवर्तन

सकाळ वृत्तसेवा

- कळवणमध्ये आमदार पवारांनी राखला गड

- घोटीत अॅड. गुळवे, बोडके यांचे पुनश्‍च वर्चस्व

- दिंडोरीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय पाटील यांना धक्का

- देवळ्यात केदा आहेरांचा करिष्मा कायम

- सिन्नरमध्ये आमदार कोकाटे व वाजे यांना समसमान जागा

Market Committee Election : जिल्ह्यातील पाचपैकी चार बाजार समित्यांमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला असून दिंडोरीत मात्र परिवर्तन झाले आहे. दिंडोरी बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती दत्तात्रय पाटील यांच्या प्रदीर्घकाळ राहिलेली सत्ता उलथून लावत माजी आमदार रामदास चारोस्कर, गणपत पाटील यांच्या पॅनलने परिवर्तन घडविले. (Market Committee election parivartan panel in Dindori nashik political news)

कळवणला आमदार नितीन पवार व माजी सभापती धनंजय पवार यांनी १८ पैकी १५ जागा जिंकत आपला गड शाबूत ठेवला आहे. माजी आमदार जे.पी. गावित, माजी सभापती रवींद्र देवरे यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

या पाच बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक उत्कंठावर्धक राहिलेल्या सिन्नरमध्ये आमदार अॅड. माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनलमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली.

कोकाटे आणि वाजे यांनी समसमान नऊ जागांवर विजय मिळविला आहे. देवळा बाजार समितीत भाजपने आपला गड कायम ठेवत सत्ता कायम ठेवली आहे. घोटीत अॅड. संदीप गुळवे आणि गोरख बोडके यांच्या पॅनलवर मतदारांना पुन्हा विश्वास टाकला आहे.

जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता.२८) मतदान झाले. यातील कळवण, दिंडोरी, सिन्नर, देवळा आणि घोटी बाजार समित्यांची मतमोजणी सायंकाळी उशिराने झाली. दिंडोरीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दत्तात्रेय पाटील यांचे २६ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला असून विरोधी परिवर्तन पॅनलने ११ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे.

येथे सर्व पक्षांना फुटीचा सामना करावा लागत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार असलेल्या दोन सर्वपक्षीय पॅनल मध्ये लढत झाली. यात माजी आमदार रामदास चारोस्कर, बाजार समितीचे संस्थापक चेअरमन गणपतराव पाटील, प्रकाश शिंदे, भाजपचे नरेंद्र जाधव, योगेश बर्डे आदींचे साथीने सत्ता परिवर्तन केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सिन्नरमध्ये विद्यमान आमदार कोकाटे व माजी आमदार वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यात कोकाटे पॅनलला नऊ तर वाजे पॅनलला देखील नऊ जागांवर विजय मिळाला आहे.

कळवणमध्ये आमदार पवार व धनंजय पवार यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवत १५ जागांवर बाजी मारली आहे. देवळात दहा जागा बिनविरोध करत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी बाजी मारली असताना मतदान झालेल्या आठ जागांमध्येही त्यांनी आपले वचस्व कायम ठेवले आहे.

घोटी बाजार समितीत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आमदार शिवराम झोले, अॅड संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी नेतृत्वाखालील लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलने विरुद्ध असलेल्या शेतकरी परिवर्तनाच्या पॅनलचा धुवा उडवत १६ जागांवर विजय मिळवला.

विजयाची घोषणा झाल्यानंतर सर्व समर्थकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT