Book esakal
नाशिक

सोशल मीडियावर पुस्तकांचे मार्केटिंग; नवोदितांनी निवडलाय अनोखा पर्याय

तुषार महाले

नाशिक : लेखकांची पुस्तक वाचनालयात पडून न राहता ती वाचली गेली पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, गत काही वर्षात नवोदित लेखकांनी पुस्तक वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. पुस्तकाच्या मार्केटिंगबरोबरच लेखक वाचकांसोबत थेट संपर्क साधत असून, त्यामुळे ऑनलाइनमुळे लेखकांच्या पुस्तकांचा खप दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाइनच्या माध्यमातून घरपोच पुस्तके

कोरोनाकाळात (Corona) नवोदितांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळाली आहे. निवांत असल्याने लेखकांना लिहिता आले, पुस्तकासाठी ऑनलाइनच्या माध्यमातून नोंदणी करून पुस्तक घरपोच देण्यात येत आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून नवोदित लेखकांना मिळणारा प्रतिसाद त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देत आहे. नवतंत्रज्ञान लेखक आणि वाचकांमधील दुवा ठरल्याचे दिसत आहे. पुस्तक ऑनलाइनच्या माध्यमातून घरपोच मिळत असल्याने वाचकांची सोय होत आहे.

पुस्तकातील मजकूर सोशल माध्यमावर

दोन वर्षाच्या काळात कोरोना निर्बंधामुळे सोशल माध्यमांवरील (Social media) ओघ वाढला आहे. नवोदित लेखकांनी त्यांच्या पुस्तकातील काही मजकूर सोशल माध्यमावर वाचकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे वाचन संस्कृती वृद्धी होण्यासोबत वाचकांची संबंधित पुस्तक वाचण्याची तयारी यामुळे पुस्तक विक्रीत वृद्धी झाली असल्याचे चित्र आहे.

''ऑनलाइन, सोशल माध्यमाद्वारे पुस्तकाचे मार्केटिंग करणे सोपे गेले. वाचकांपर्यंत घरपोच पुस्तक पोच झाली आहे. ऑनलाइनमधून पुस्तकांची प्री ऑर्डर मिळत असल्याने सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. सोशल माध्यमावर मजकूर टाकल्यानंतर वाचकांचा मिळणारा प्रतिसाद प्रोत्साहन देणारा ठरतो आहे.'' - प्रथमेश पाठक, कवी

''पहिले पुस्तक लॉकडाउनमध्ये आले. ऑनलाइन, सोशल माध्यमावर वाचकांसाठी प्री- ऑर्डरची व्यवस्था केली होती. वाचकांच्या प्रतिसादामुळे पहिली आवृत्ती दोन महिन्यात संपली. नवतंत्रज्ञानाचा लॉकडाउनमध्ये प्रभावी वापर करण्याचे शिकलो असून, ऑनलाइन कवी संमेलनाच्या माध्यमातून जगभरातील मराठी नागरिकांसोबत संवाद साधता आला.'' - प्रशांत केंदळे, कवी

''डिसेंबरमध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. पहिली आवृत्ती संपली असून, सोशल माध्यमातून प्रतिक्रिया, समीक्षण होत आहे. सोशल माध्यमावर समीक्षण वाचल्यानंतर पुस्तक विक्रीसाठी प्रतिसाद वाढला. वाचकांमधून उत्सुकता निर्माण होऊन सोशल माध्यमांद्वारे पुस्तक सर्वदूर पोचले आहे.'' - सायली आचार्य, लेखिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT