marriage esakal
नाशिक

Marriage Date Delay : या कारणामुळे लागणार लग्नसराईला 45 दिवसाचा ब्रेक!

३१ मार्च ते २६ एप्रिलपर्यंत गुरू लोप पावणार असल्याने मुहूर्त नाहीत

प्रभाकर बच्छाव

येसगाव (जि. नाशिक) : गेल्या पाच महिन्यापासून धूम असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने तसेच पंचांगानुसार ३१ मार्च ते २८ एप्रिलपर्यंत गुरू लोप असल्याने विवाहांना तब्बल दीड महिन्याचा म्हणजे ४५ दिवसाचा ब्रेक लागला आहे. (Marriage Date Delay 45 days break for Lagna Sarai due to no muhurat nashik news)

यंदाही लग्नसराईला तुळशी विवाहापासून ५ नोव्हेंबर २२ नंतर सुरवात झाली. परंतु विवाह मुहूर्त २६, २७, २८, २९ या दिवशी होते. डिसेंबरमध्ये आठ, जानेवारी २३ मध्ये चार, फेब्रुवारीमध्ये नऊ व मार्चमध्ये पाच विवाह मुहूर्त होते.

५ नोव्हेंबर २२ ते १९ मार्च २३ पर्यंत सरासरी ४० विवाह मुहुर्तांचा बार उडाला. विवाह मुहूर्त कमी असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात घटिका व गोरजमुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर लग्नांची धामधूम दिसून आली.

मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा असल्यामुळे लग्न समारंभाला वऱ्हाडींची संख्या प्रमाणातच होती. एप्रिल महिन्यात गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत. मेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होण्याची चिन्ह दिसत आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

नोकरवर्ग तसेच शेतकरी वर्गात मे महिन्यात विवाहांना जास्त पसंती दिली जाते. शाळा कॉलेजांना या महिन्यात सुट्टी असते. ग्रामीण भागात शेतकरी शेती कामाकडे वळत असल्यामुळे जूनमध्ये कुटुंबातल्या विवाह करणाऱ्या मुला-मुलींच्या विवाहाच्या तारखा शक्यतो निवडत नाहीत.

पंचागानुसार पाच मुहूर्त

विड्याच्या पानापासून ते सोन्याच्या आभूषणांपर्यंत विवाह कार्यात लागणाऱ्या वस्तूंमुळे गेल्या एक ते दीड महिन्याच्या काळात बाजारपेठेत कोट्यवधी रुपयाची उलाढाल थांबण्याची शक्यता आहे. गुरू लोप असला तरी एप्रिल महिन्यात पंचांगानुसार १५, २३, २४, २९, ३० या दिवशी विवाह मुहूर्त दिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार सपाट पातळीवर बंद! कोणते सेक्टर दबावात? जाणून घ्या आजचा मार्केट ट्रेंड

Baramati Plane Crash : बारामतीत अजितदादांच्या विमानअपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांची पोलिस ठाण्यावर धडक...

Lohgaon Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Latest Marathi News Live Update : 148 महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग; परिसरात भीतीचे वातावरण

Baramati Plane Crash : बारामती विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने; सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती

SCROLL FOR NEXT