अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या 
नाशिक

कारसाठी पैसे न आणल्याने छळ; विवाहितेची मुलीसह विहिरीत आत्महत्या

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : सासरच्या छळाला कंटाळून कुसुर येथील विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सासू, सून व पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसह सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

कुसुर येथील बेपत्ता मायलेकीचा मृतदेह आज गावातीलच विहिरीत आढळून आल्याने हळहळ व्यक्त झाली. जयश्री सचिन गायकवाड (२४) व मुलगी प्रांजल सचिन गायकवाड (२) या बेपत्ता मायलेकीबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. या मायलेकीचा शोध सुरू असताना नातेवाईकांना त्याच्या शेतातील विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्यानंतर युवक व तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांनी तीन मोटरच्या साह्याने यातील सुमारे ४० ते ५० फूट पाणी उपसल्यानंतर विहिरीच्या तळाशी गाळामध्ये दोघी मायलेकींचा मृतदेह आढळून आला.

जयश्रीने आपल्या पोटच्या गोळ्यासह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जयश्रीचे वडील नारायण रंगनाथ आहेर यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्रीचा पती सचिन गायकवाड, सासरे सूर्यभान गायकवाड, सासू सुमन गायकवाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जयश्रीला कौटुंबिक कारणणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता शिवाय माहेरून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून मायलेकीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सटासट...! IND vs WI सामन्यात तरुणीने शेजारी बसलेल्या तरुणाच्या कानाखाली जाळ काढला, Video Viral

Railways Advise: प्रवाशांनो ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन गेलात तर खबरदार! दिवाळीसाठी रेल्वेकडून नवी नियमावली जारी; काय लिहिलंय?

Dhananjay Munde: ''तुम्हाला टक्क्यातसुद्धा ठेवणार नाही'' वंजारी आरक्षणाला विरोध, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा

Japan Flu Outbreak 2025: जपानमध्ये महामारीची शक्यता! ४ हजारहून अधिक रुग्ण; भारतासाठी कितपत आहे धोका?

वेस्ट इंडिजने १२० धावांची आघाडी घेतली, चाहत्यांना १९९७ ची 'ती' मॅच आठवली! सचिन, द्रविड, गांगुलीचा संघ तेव्हा 'वाईट' हरला होता

SCROLL FOR NEXT