suicide esakal
नाशिक

पती-सासुच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

याबाबत वणी पोलिसांत पती व सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : खेडगाव (ता. दिंडोरी) येथील विवाहितेने शुल्लक कारणाहून पती व सासूच्या सततच्या शिविगाळ व शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. याबाबत वणी पोलिसांत पती व सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडगाव येथील दीपाली प्रभाकर गायकवाड ( २९) वर्षे हीचे सहा वर्षांपूर्वी प्रभाकर तुकाराम गायकवाड (३३, रा. खेडगाव) यांच्याशी लग्न झाले होते. सहा वर्षानंतर दीपालीस क्षुल्लक कारणावरुन शिविगाळ, मारहाण करुन तिचा शारीरीक, मानसिक छळ पती प्रभाकर व सासू विमलबाई तुकाराम गायकवाड करीत होते. त्यांच्या सततच्या शारीरीक व मानसिक जाचास कंटाळून दीपालीने मंगळवारी (ता.१४) दुपारी दोनच्या पूर्वी खेडगाव येथील राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याबाबत दीपालीचे भाऊ रविकांत बाळू गुंबाडे (२७, रा. पालखेड बंधारा, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीवरुन वणी पोलिसांत पती प्रभाकर गायकवाड, सासू विमलबाई गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रतन पगार व रघुनाथ भरसट तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT