Death
Death esakal
नाशिक

Nashik Crime: छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस : शेतातील कामे येत नाहीत, तसेच गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेली सतत मारहाण व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून २७ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

शिंदे (ता. चांदवड) गावात ही घटना घडली असून, विवाहितेचे वडील प्रभाकर काशीनाथ चव्हाण (रा. पिंपळद, ता. चांदवड) यांनी वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पती, सासू व सासरा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Married woman commits suicide due to torture Case filed against husband mother in law father in law Nashik Crime)

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पिंपळद येथील निशा (वय २७) हिचा विवाह शिंदे येथील दिलीप शिंदे यांचा मुलगा अक्षयसोबत झाला होता. विवाहानंतर पती अक्षय, सासरा दिलीप, सासू नंदाबाई शिंदे हे निशाला माहेरून पैसे आणण्याची मागणी करीत होते.

शेतातील कामे येत नाहीत, तू इथे थांबू नकोस अशा कुरापती काढून निशाला मारहाण केली जात असे. अक्षयने गाडी घेण्यासाठी निशाला माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली.

पैसे न आणल्यास तिकडेच राहा, परत येऊ नकोस, असे तिला सांगत असे. सासरच्या त्रासाला कंटाळून निशाने गुरुवारी (ता. २६) रात्री दहाच्या सुमारास विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

या घटनेबाबत माहिती समजताच वडनेरभैरव (ता. चांदवड)चे सहाय्यक पोलिस निरीक्षक भांबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत पती अक्षय, सासरा दिलीप व सासू नंदाबाई या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक त्रिभुवन तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT