married woman 123.jpg 
नाशिक

"लग्नात माहेरून मिळालेले दागिने आमच्याकडे देत नाहीस...म्हणजे तुझे बाहेर काहीतरी..."

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ सटाणा : लग्नामध्ये माहेरून मिळालेले दागिने देत नाही, तसेच चारित्र्यावर संशय घेत गेल्या 16 वर्षांपासून सासरी होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) शिवारात सोमवारी (ता. 24) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

समजकुवर ऊर्फ सुमित्रा मुकुंद पवार (वय 33) असे या विवाहितेचे नाव असून, त्यांचा 10 मार्च 2010 ला मुकुंद विजयसिंग पवार यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास दिला जात असल्याने त्यांनी 14 मे 2004 ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सामंजस्याने पुन्हा संसार सुरू होऊन सुमित्रा यांना दोन अपत्ये झाली. मात्र काही दिवसांतच पुन्हा लग्नावेळी माहेरून आणलेल्या दागिण्यांची मागणी करत सासरी त्रास सुरू झाला. दागिने देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ व चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देऊन मारहाण केली जात होती.

अखेर तिची आत्महत्या.. यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली

अखेर सोमवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी सुमित्रा यांचे बंधु श्री. सोळुंखे (रा. कोठरे) यांनी सटाणा पोलिसांत मुकुंद पवार (पती), विजयसिंग पवार (सासरा), सुलाबाई पवार (आजलसासू), अमर ऊर्फ भाऊसाहेब पवार (चुलत दीर), मीनाबाई महाले (नणंद), दीपक महाले (नंदई, रा. रावळगाव), ज्योतीबाई मोरकर (नणंद), गोकुळ मोरकर (नंदई, रा. कौतिकपाडे) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे तपास करीत आहेत. 

मृतदेह सासरकडील मंडळीस देण्यास विरोध

दरम्यान, सुमित्राने आत्महत्या केली नसून, तिचा खून झाल्याचा आरोप कोठरे (ता. मालेगाव) येथील तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह आणल्यानंतर नातेवाइकांनी "आम्हाला मालेगाव येथे शवविच्छेदन करावयाचे असल्याचे सांगत सटाणा येथे शवविच्छेदन का केले', असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच, मृतदेह सासरकडील मंडळीस देण्यास विरोध दर्शविला. मात्र, सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी करत तत्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशीचे आश्‍वासन दिल्यानंतर सुमित्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत नामदेव पांडुरंग सोळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सटाणा पोलिस ठाण्यात सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पती आणि सासऱ्यास अटक करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT