Martin Whiteley speaking at a press conference. Neighbors Luciana, Jonathan Ursell, Sanjay Sonawane, Hemant Rathi, Kantilal Chopra esakal
नाशिक

Nashik News: नाशिकच्या निर्यातीला थेम्स फ्रिपोर्टचे बळ : मार्टिन व्हाईटली

कृषी, ऑटोमोबाईल, ई-कॉमर्स उत्पादनांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, डाळिंब, वाइन या कृषी उत्पादनांसह ऑटोमोबाईल, बांधकाम, ई कॉमर्स व लॉजिस्टीक क्षेत्रातील उत्पादनांची आयात-निर्यात प्रक्रिया लंडन येथील थेम्स फ्री पोर्टच्या माध्यमातून अधिक सुलभ होणार आहे.

निर्यातीला चालना मिळाल्यास नाशिक दुप्पट गतीने विकसित होईल, असा विश्वास ‘थेम्स फ्रीपोर्ट’चे सीईओ मार्टिन व्हाईटली यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Martin Whiteley statement Thames Freeport boosts Nashik exports Nashik News)

थेम्स फ्री पोर्टच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नाशिकमधील निर्यातदार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निमा व आयमाच्या पदाधिकाऱ्यांशी गुरुवारी (ता.७) संवाद साधला.

यावेळी थेम्स फ्री पोर्टचे व्यापार आणि गुंतवणूक विभागाचे प्रमुख लुसियाना, युके पोर्ट आणि टर्मिनलचे संचालक क्रिस्टोफर रॉबर्टग्रीन, दलजितसिंग ओबेरॉय, नाशिकचे उद्योजक रवींद्र गांधी, हेमंत राठी, क्रांतिलाल चोपडा, संजय सोनवणे, राजाराम सांगळे उपस्थित होते.

जिल्ह्यातून दरवर्षी कृषी, ऑटोमोबाईलसह विविध क्षेत्रातील उत्पादनांची एकूण २२ हजार कोटी रुपयांची निर्यात होते. नाशिकच्या निर्यातीमध्ये प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, डाळिंब, वाइन यांसह ऑटोमोबाईल क्षेत्राचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

त्यादृष्टीने विचार करून निर्यात अधिक सुलभ करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे कशी लागतील याचा विचार करण्यात येत आहे. भारतातून विदेशात निर्यात केल्यानंतर तेथून पुढील देशांना निर्यात करण्यासाठी पुन्हा निर्यात शुल्क लागते.

‘थेम्स’च्या माध्यमातून निर्यात केल्यास हे निर्यात शुल्क लागणार नसल्याची माहिती सीईओ मार्टिन व्हाईटली यांनी दिली. जागतिक स्तरावर १३० पेक्षा अधिक पोर्टशी जोडलेले थेम्स हे लंडनमध्ये १७०० एकरवर विस्तारलेले आहे.

या पोर्टच्या माध्यमातून अन्नधान्य, ऑटोमोबाईल, बांधकाम व ई- कॉमर्स अर्थात लॉजिस्टीक या चार क्षेत्रातील उद्योगांना अधिक चालना मिळणार आहे.

त्यादृष्टीने थेम्सचे पदाधिकारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. नाशिकमध्ये त्यांनी सह्याद्री उद्योजकांशी संवाद साधताना फार्मसह अंबड व सातपूर एमआयडीसीतील काही निवडक कंपन्यांना भेटही दिली.

नाशिकच्या उद्योजकांचा सहभाग

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून नाशिकच्या निवडक व्यावसायिकांनी थेम्स फ्रीपोर्टच्या पदाधिकाऱ्यांंशी निर्यात व आयात विषयासंबंधी संवाद साधला.

निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे, शासकीय धोरण याविषयीच्या प्रश्नांची सोडवणूक या चर्चासत्रातून झाली. महाराष्ट्र चेंबर्सचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख संजय सोनवणे, उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT