Buildings in Mary Colony are covered with trees. esakal
नाशिक

Nashik News : मेरी कॉलनीला झाडाझुडपांचा विळखा!

मेरीच्या एकेकाळी वैभवशाली असलेल्या कॉलनीतील काही भागातील इमारती दुर्लक्षित झाल्यामुळे विविध प्रकारच्या झाडाझुडपांच्या गर्तेत सापडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : मेरीच्या एकेकाळी वैभवशाली असलेल्या कॉलनीतील काही भागातील इमारती दुर्लक्षित झाल्यामुळे विविध प्रकारच्या झाडाझुडपांच्या गर्तेत सापडली आहे. या चांगल्या इमारती असून, त्या वापरात येत नसल्यामुळे त्यांचा परिसराची दुरवस्था झालेली आहे.

दुर्लक्ष असल्याने येथे कचरा फेकला जात आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत. अंतर्गत रस्ते खराब झालेले आहेत. (Mary Colony full of bushes non cleanliness Nashik News)

मेरी कॉलनीत पूर्वी मेरीचे अधिकारी व कर्मचारी यांचा निवास होता. कालांतराने त्यांनी शहराच्या इतर भागात आपल्या स्वतंत्र निवासाची व्यवस्था केल्यामुळे हळूहळू त्यांची वस्ती कमी झाली. या वसाहतीच्या दक्षिणेला काही शासकीय कार्यालये आणि शाळा असल्यामुळे वर्दळ तरी दिसते.

मात्र, उत्तरेच्या टोकाला इमारती दुर्लक्षित झालेल्या असल्यामुळे त्यांच्या भोवताली इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची आणि झुडपाची वाढ झालेली आहे की, त्यामुळे काही इमारती झाकल्याने दिसेनाशा झाल्या आहेत.

गुन्हे अन्वेषण विभागाचे कार्यालय, सीडीओ मेरी शाळा, निवासी वसतीगृह, टपाल कार्यालय, सेतू कार्यालय, मेरी पोलिस चौकी अशी कार्यालये या भागात आहे. मेरीचे सभागृह, वाचनालय असल्याने या भागाकडे एकदमच दुर्लक्ष झालेले नाही.

त्यात निवासी वसतिगृहाच्या जागेत कोविड सेंटर सुरू होते, त्या वेळी या भागात वर्दळ वाढली आहे. वसतिगृहासाठी इमारतीला डागडुजी करून ती ज्याप्रमाणे वापरात आणली होती. त्याचप्रमाणे इतरही इमारती वापरात आणणे शक्य होऊ शकते.

मात्र, या इमारती वापराविना पडून राहिल्याने त्या इमारतींची दुर्दशा झालेली आहे. कित्येक इमारतींवर झाडांची रोपे वाढल्याने भिंतींना तडे गेलेले आहेत. येथील ड्रेनेजलाइन फुटलेली आहे. रस्ते उखडले आहेत.

इमारतींचा वापर करून घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मेरीच्या वसाहतीचा भाग हा राज्य शासनाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत निर्णय घेणे गरजेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT