Jain brothers participating in the march organized by the entire Jain community to the police station to protest the killing of Jain sages.  esakal
नाशिक

Jain Muni Murder Case : लासलगावी जैन मुनींच्या हत्येचा निषेध; सकल जैन समाजातर्फे विराट मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

Jain Muni Murder Case : जैन समाजाचे तपस्वी गुरूदेव आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांच्या कर्नाकटातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्यांची हत्या केल्याप्रकरणी लासलगाव येथील जैन समाजबांधवांनी गुरुवारी (ता.२०) या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (Massive silent march by entire Jain community to protest killing of Jain sage at Lasalgaon nashik news)

जैन समाज बांधवांतर्फे विराट मोर्चा काढत पोलिसांना निवेदन देण्यात आले.

सकाळी येथील जैन स्थानकापासून लासलगाव पोलिस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढून सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व सर्कल भाऊसाहेब देवकाते यांना निवेदन देण्यात आले.

कर्नाटकातील चिकोडी येथे जैन समाजाचे मुनी कामकुमार नंदीजी महाराजांची निर्दयपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात जैन बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्या घटनेचा येथे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. नागरिकांनी दुपारी बारापर्यंत आपली आस्थापना बंद ठेवत घटनेचा निषेध केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संघपती नितीन जैन, ओमप्रकाश राका, सुरेश दगडे, अशोक दगडे, चंदनमल धाडीवाल, आनंद आब्बड, संतोष ब्रम्हेचा, सुनील आब्बड, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, डि. के. जगताप, नाशिक मर्चंट बँकेचे संचालक प्रकाश दायमा, संतोष पलोड, अशोक होळकर, शिवा सुरासे, राजेंद्र चाफेकर, शंतनू पाटील, जव्हेरीलाल ब्रम्हेचा, गणेश डोमाडे, बाळासाहेब दराडे, नितिन नहाटा, पंकज आब्बड, प्रकाश पाटील, अमोल थोरे, बबन शिंदे, महेश बाफना, सचिन होळकर, गणेश जोशी, संतोष पानगव्हाणे, डॉ. सुजय गुंजाळ, डॉ. विलास कांगणे, डॉ. युवराज पाटील, गिरीश साबद्रा, विशाल पालवे, होळकर, गोटू बकरे, शीतल साबद्रा, अजय अग्रवाल, भाऊसाहेब देवकाते, सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच या घटनेतील दोषीस कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी जैन समाज बांधवांनी केली. निवेदन देताना सरपंच जयदत्त होळकर यांच्यासह सकल जैन बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT