winter cold sakal
नाशिक

Nashik Winter Update: थंडीचा जोर, तापमानात घसरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : वातावरणातील गारवा वाढत असून, तापमानात पाऱ्याची घसरण सुरु आहे. शुक्रवारी (ता.१७) नाशिकचे किमान तापमान १४.१ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. कमाल तापमानातही घसरण होऊन ३० अंश सेल्सिअस राहिले.

गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झालेला असताना, तापमानात सातत्‍याने घट होत आहे. (maximum temperature dropped to 30 degrees Celsius in nashik news)

यंदाच्‍या हंगामात आत्तापर्यंत अपेक्षित गारठा जाणवत नव्‍हता. ऑक्‍टोबरच्‍या अखेरीस थंडी पडलेली असताना पारा वाढत होता. आता पुन्‍हा पाऱ्यात घसरण सुरु झालेली आहे.

सायंकाळनंतर वातावरणात वाहणारा थंड वारा नाशिककरांना थंडीची अनुभूती करून देणारा ठरत आहे. शुक्रवारी नाशिकचे किमान तापमान १४.१ अंश सेल्सिअस नोंदविले असून, हे यंदाच्‍या हंगामाचे निच्चांकी तापमान आहे. यापूर्वी कालच १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती.

गेल्‍या काही आठवड्यांपासून दिवसाच्‍या वेळी तप्त सूर्यकिरणांमुळे कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहात होते. परंतु आता थंडावा निर्माण होत असताना कमाल तापमानातही घसरण सुरू झाली आहे. शुक्रवारी नाशिकचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहिले. येत्‍या काही दिवसांत आणखी घसरण शक्‍य असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरनंतर नाशिकच थंड

राज्‍यात सध्या थंडीचा तडाखा वाढलेला आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्‍यापाठोपाठ नाशिक सर्वाधिक थंड राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT