winter 
नाशिक

Nashik Winter Update: नाशिकचे कमाल तापमान राज्‍यात निच्चांकी; 24.7 अंश सेल्सिअसची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: यंदाच्‍या हिवाळी हंगामात एकदाही नाशिकचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षा खालावलेले नाही. असे असले तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहात असल्‍याने वातावरणात कमालीचा गारवा जाणतो आहे.

परिणामी प्रमुख शहरांच्‍या तुलनेत बुधवारी (ता.२०) नाशिकचे कमाल तापमान राज्‍यात निच्चांकी राहिले. मालेगावचे २४.६ अंश तर नाशिकचे कमाल तापमान २४.७ अंश सेल्सिअस होते. (Maximum temperature of Nashik is lowest in state news)

अवघ्या काही दिवसांपूर्वीपर्यंत नाशिकचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या सुमारास राहात होते. त्‍यामुळे दिवसाच्‍या वेळी काही प्रमाणात सामान्‍य वातावरण अनुभवायला येत होते. परंतु काही दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झालेला असताना पाऱ्यात सातत्‍याने घसरण होते आहे.

सद्यःस्‍थितीत किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या जवळ राहाते आहे. मात्र दुसरीकडे कमाल तापमानात सातत्‍याने घसरण सुरु आहे.

बुधवारी (ता.२०) नाशिकचे कमाल तापमान राज्‍यात निच्चांकी राहिले. दुसरीकडे किमान तापमान मात्र इतर प्रमुख शहरांच्‍या तुलनेत अधिक राहात आहे.

वाऱ्यामुळे थंडीची अनुभूती

सध्या पाऱ्यात विशेष घसरण बघायला मिळत नसली तरी ताशी १० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वारा वाहतो आहे. त्‍यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत असल्‍याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. येत्‍या दिवसांत पारा घसरून थंडी अधिकच वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT