Officials cheering after the election of Khairgavan Sarpanchpadi Maya Pote. esakal
नाशिक

Nashik News: खैरगव्हाण सरपंचपदी माया पोटे विजयी! राजकीय गटबाजीत समान मते मिळाल्याने चिठ्ठीत उघडले नशीब

सकाळ वृत्तसेवा

येवला : खैरगव्हाण -तांदुळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माया पोटे यांची निवड झाली. सरपंचपदासाठी कुसूम पडवळ आणि माया पोटे या दोन सदस्यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली.

चिठ्ठीत पोटे यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. (Maya Pote wins Khairgavan sarpanch seat Luck opened in Chitthi by getting equal votes in political grouping Nashik News)

खैरगव्हाण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीपासून नेहमीच चर्चेत आली. सुरवातीचे सरपंच माणिक सावंत यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही झाल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी विशेष सभा शनिवारी (ता. ३१) झाली.

सरपंचपदासाठी कुसूम पडवळ व माया पोटे या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अर्ज मुदतीत दाखल झाले होते. विशेष म्हणजे सरपंचपदी अर्ज दाखल झालेले दोन्ही उमेदवार तांदूळवाडी येथील आहेत.

दोन अर्ज आल्यामुळे दुपारी दोननंतर मतदान घेण्यात आले. मात्र, दोघांनाही समसमान तीन-तीन मते मिळाली. यामुळे पेच निर्माण झाल्याने १३ वर्षीय रोहन पानसरे या मुलाला बोलवून चिठ्ठी काढण्यात आली.

माया पोटे यांची चिट्ठी निघाल्याने पोटे यांना सरपंचपदावर विजयी घोषित करण्यात आले. पोटे समर्थकांनी एकच जल्लोष केला. भिमाजी शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनी पुढाकार घेतला.

ग्रामपंचायत सदस्य सोपान ठाकरे, मंगला लोखंडे यांच्यासह भिमाजी शिंदे, राजेश शिंदे, राजेंद्र सैद, राजेंद्र लोखंडे, संदीप शिंदे, विष्णु शिंदे, शिवाजी पळसकर, संदीप पोटे, सतीश शिंदे, ज्ञानेश्वर पोटे, आप्पासाहेब शिंदे, वैभव शिंदे, जयेश शिंदे, अर्जुन घुसळे, बाजीराव सालमुठे, राम शिंदे, नकुल शिंदे, समर्थ शिंदे, ज्ञानदेव सैद, अरुण सालमुठे आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सावरगावचे मंडलाधिकारी राठोड यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेविका साधना थोरात व शिपाई गोरख सालमुठे यांनी सहकार्य केले.

"मी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उर्वरित कालावधीसाठी विकासकामे करेल. ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन काज करेल."-माया पोटे,सरपंच,खैरगव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT