satish kulkarni esakal
नाशिक

महापौरांचे स्वपक्षालाच धक्कातंत्र! निधीची पळवापळवी

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक निधीची पळवापळवी ही बाब नित्याची असली, तरी स्वपक्षातीलच नगरसेवकांच्या कामांना कात्री लावून त्यांचा निधी स्वत:च्या प्रभागाच्या विकासासाठी वळविण्याचा प्रकार महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकातून स्पष्ट झाला आहे. पंचवटी प्रभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांना कात्री लावत महापौरांनी त्यांच्या स्वत:च्या प्रभागात निधी वळवून स्वत:चे स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यात स्थायी समिती सभापती गणेश गिते व माजी गटनेते जगदीश पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (mayor-satish-kulkarni-political-marathi-news-jpd93)

निधीची पळवापळवी; स्वत:च्या प्रभागावर कामांची उधळण

महापौर कुलकर्णी यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचा ठराव प्रशासनाकडे सुपूर्द केला. त्यापूर्वी स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात पंचवटी विभागातील कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला होता. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची वाढ करत महापौर कुलकर्णी यांनी कामांमध्ये घट करताना पंचवटी विभागातील विशेषत: प्रभाग चारमधील कामांना कात्री लावली आहे. ती कामे पूर्व विभागातील प्रभाग २३ मध्ये म्हणजे स्वत:च्या प्रभागामध्ये वळवत आगामी निवडणुकीतील त्यांचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अंदाजपत्रकात दर्शविलेल्या विकासकामांचा फुगा महापालिकेचे अर्थकारण बिघडल्याने फुटणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याने निधीअभावी अनेक कामे रेंगाळणार आहेत. त्यामुळे महापौरांनी त्यांच्या प्रभागात चालविलेल्या विकासकामांच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागणार आहे.

प्रभाग एक, चारच्या कामांवर संक्रांत

माजी गटनेते जगदीश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात प्रभाग चारमध्ये ४३ कोटींच्या कामांचा समावेश केला होता. मात्र, महापौरांकडून कात्री लावताना याच कामांवर गंडांतर आणल्याने भाजपमध्ये निधी पळवापळवी वरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वज्रेश्‍वरीनगरमध्ये घरकुल योजना राबविणे, गुंजाळनगर भागात रिंग रोड विकसित करणे, उड्डाणपूल बांधणे, क्रीडांगणे विकसित करणे या महत्त्वाच्या कामांना कात्री लागली आहे. प्रभाग २३ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, वडाळा चौफुली ते पूना रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, खुल्या नाल्यांवर स्लॅब टाकणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश महापौरांनी केला.

स्थायी सभापती, माजी महापौरांना धक्का

शहरात त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल येथे दोन उड्डाणपूल तयार होत असताना, पंचवटी विभागात पेठ रोडवरील शरदचंद्र मार्केटसमोर व दिंडोरी रोडवर प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात सभापती गणेश गिते यांनी केला होता. मात्र, महापौरांनी कामांमध्ये घट करताना गिते व माजी महापौर रंजना भानसी यांच्याबाबतही धक्कातंत्र अवलंबले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT