Mayur Education Society office vandalized for extortion Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : खंडणीसाठी मयूर एज्युकेशन सोसायटी कार्यालयाची तोडफोड

शहरातील हजारखोली भागातील मयूर एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात घुसून फक्त ३०० रुपये हप्ता देतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील हजारखोली भागातील मयूर एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात घुसून फक्त ३०० रुपये हप्ता देतात. दर आठवड्यास अतिरिक्त खंडणी द्या. अन्यथा तुम्हाला मारुन टाकू असा दम देत शस्त्र व चॉपर हवेत फिरवून दहशत निर्माण करीत दोघा जणांनी कार्यालयाची तोडफोड केली.

याप्रकरणी आयशानगर पोलिसांनी शस्त्राचा धाक दाखवीत दमबाजी करणाऱ्या दोघांना अटक केली. (Mayur Education Society office vandalized for extortion Nashik Crime News)

एक जानेवारी २०२४ रोजी मयूर एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात जावीद मोहम्मद अली (वय ३४, रा.हजारखोली) हे बसलेले असताना संशयित मोहम्मद मुस्तफा रईस अहमद (वय ३८, रा. नया इस्लामपुरा) व मोहम्मद इब्राहिम निसार अहमद (वय २४, रा. हजारखोली) यांनी प्रवेश करून चॉपरने ऑफिसमध्ये तोडफोड सुरु केली.

जाविदचा मित्र समजावून सांगण्यास गेला असता दोघे जाविदच्या अंगावर धावून आले. ‘तू सिर्फ मुझे तीनसो रुपये हप्ता देता है । कम देते हो, जादा मांगे तो नाटक करते हो । तुमको खत्म कर डालूंगा’ असे म्हणत शस्त्रास्त्र फिरवून कार्यालयातील लॅपटॉप, संगणक, कुलर, काऊंटर, फर्निचर आदी साहित्याची तोडफोड व नासधूस केली.

जावीद अलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे, सहाय्यक निरीक्षक बोरसे, उपनिरीक्षक राजेंद्र पगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT