MBA Admission Registration Deadline until Friday
MBA Admission Registration Deadline until Friday 
नाशिक

एमबीए प्रवेश नोंदणीची शुक्रवारपर्यंत मुदत; कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला नव्या वर्षात सुरवात 

अरुण मलाणी

नाशिक : एमबीए अभ्यासक्रमाच्‍या रखडलेल्‍या प्रवेशप्रक्रियेला पुन्‍हा गती प्राप्त झाली आहे. सीईटी सेलतर्फे जारी करण्यात आलेल्‍या सुधारित वेळापत्रकानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक ऑनलाइन नोंदणीप्रक्रिया राबविण्यासाठी शुक्रवार (ता. २५) पर्यंत मुदत असणार आहे. 

३१ डिसेंबरला अंतिम गुणवत्तायादी

सीईटी सेलतर्फे जारी करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत असेल. तर कागदपत्रांची ई-स्क्रूटिनी करण्यासाठी शनिवार (ता. २६)पर्यंत मुदत असेल. सोमवारी (ता. २८) तात्‍पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीसंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी २९ व ३० डिसेंबरची मुदत आहे. त्यानंतर ३१ डिसेंबरला अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला नवीन वर्षातील पहिला दिवस १ जानेवारीपासून सुरवात होईल. यात १ ते ३ जानेवारीदरम्‍यान विद्यार्थ्यांना प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आवश्‍यक ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत असेल. पहिली निवडयादी ६ जानेवारीला जारी केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी ७ ते ९ जानेवारीदरम्‍यान मुदत असेल. दुसऱ्या कॅप राउंडची प्रक्रिया ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. 

दरम्‍यान, कॅप राउंडअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया २४ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सीईटी सेलमार्फत आखले गेले आहे. तर ११ जानेवारीपासून वर्गांना सुरवात करता येणार आहे. जातवैधता प्रमाणपत्रासह अन्‍य कागदपत्रे विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार आहेत. 

जिल्‍हा- इन्‍स्‍टिट्यूटची  संख्या - उपलब्‍ध जागा
नाशिक - २२ -१,९२० 
नगर - १४ - १,४१० 
धुळे - ०१ - ६० 
जळगाव - ०९ - ७२० 
नाशिक विभाग - ४६ - ४,११० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

SCROLL FOR NEXT