mba cet exam esakal
नाशिक

MBA CET Exam : वंचित विद्यार्थ्यांना पुन्हा देता येणार 'या' तारखेला एमबीएची सीईटी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एमबीए प्रवेशासाठीच्या सीईटीपासून (MBA CET) तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. (mba cet re exam of cet for mba on 27 april nashik news)

येत्या २७ एप्रिलला या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. तसे सुचनापत्र सीईटी सेलने जारी केले आहे. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

राज्यात एमबीएच्या प्रवेशासाठी नुकतीच सीईटी परीक्षा झाली. यामध्ये नाशिकसह राज्याच्या विविध भागांत गोंधळ झाल्याच्या तक्रारी होत्या. नाशिकमध्ये एका केंद्रात ४० मिनिटे आधीच ऑनलाईन पेपर सबमिशन बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर जमा करणेदेखील शक्य झाले नव्हते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह आमदार फरांदे यांची भेट घेऊन मदतीसाठी साकडे घातले होते. आमदार फरांदे यांनी तत्काळ दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सीईटी सेलच्या आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, तसेच लेखी पत्रदेखील दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन येत्या २७ ला पुनर्परिक्षा होणार असून, त्यासाठी अर्ज करण्यास ११ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीवरुन परतताना भीषण अपघात! ५० विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत ४ मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

अभिनेत्रीच्या पर्सनल मेकअप रुममध्ये साडी बदलली म्हणून दिवसभर झाडाखाली बसवलं; वर्षा दांदळे यांनी सांगितला हिंदीतला अनुभव

Mangalwedha News: जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील ऊसदराचा तोडगा कारखानदारांना अमान्य; मंगळवेढ्यात युटोपियन कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर अंबड ठाण्यात; पेन ड्राईव्हमध्ये दिले पुरावे

बाबो! सैफ अली खानने करीनाच्या एक्स बॉयफ्रेंडला मारली मिठी; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT