MBA.jpg
MBA.jpg 
नाशिक

एमबीए-एक्‍झिक्‍युटिव्‍ह प्रवेशासाठी अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदत!

अरुण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत एमबीए (एक्झिक्‍युटिव्‍ह) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया नाशिक उपकेंद्रातील व्‍यवस्‍थापनशास्‍त्र महाविद्यालयात सुरू आहे. पात्र उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवार (ता. १५)पर्यंत आहे. 

अनुभवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक 

नोकरदारांसाठी तसेच, व्‍यावसायिकांसाठी विशेष उपयुक्‍त असलेल्या या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना मार्केटिंग, फायनान्‍स, ऑपरेशन्स किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अशा त्‍यांनी निवडलेल्‍या विषयात पदवी प्राप्त होईल. प्रवेशासाठी यूजीसी, एआयसीटीई, ऑल इंडिया युनिव्‍हर्सिटी मान्‍यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पन्नास टक्‍के, आरक्षण लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्‍के आणि तीन वर्षांचा व्‍यावसायिक, व्‍यवस्‍थापकीय स्‍वरूपाचा अनुभव आवश्‍यक आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आपले अनुभवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे. 

पदवीनंतर हा अनुभव ग्राह्य धरला जाईल. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेनंतर निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर जाहीर केली जाईल. विद्यार्थी स्‍वतः त्‍याच्‍या आयडी व पासवर्डद्वारे यादी पाहू शकतील. शिक्षणक्रमाविषयीची सविस्‍तर माहिती विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. तसेच, विद्यापीठाचे उपकेंद्र, अचानक चौक, पडसाद कर्णबधिर विद्यालयाजवळ, लेखानगर येथे संपर्क साधता येऊ शकेल.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT