exam.jpg
exam.jpg 
नाशिक

वैद्यकीयच्‍या परीक्षा होणार दोन टप्‍प्यांत; २६ ऑक्‍टोबरपासून उन्‍हाळी सत्र परीक्षा

अरुण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विद्यापीठाच्‍या विविध अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले आहे. उन्‍हाळी २०२० सत्राच्‍या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रम व पदविका व पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या वेळापत्रकाचा समावेश आहे. त्‍यानुसार २६ ऑक्‍टोबरपासून या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. दोन टप्‍यांमध्ये या लेखी परीक्षा पार पडतील. 

२६ ऑक्‍टोबरपासून उन्‍हाळी सत्र परीक्षांना होणार सुरुवात 

सध्याच्‍या कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सर्वच स्‍तरावरील परीक्षा प्रभावित झालेल्‍या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्‍या मार्फत वेळोवेळी परीक्षांसंदर्भातील धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्‍यानुसार अंतिम वर्षाच्‍या परीक्षा घेणे बंधनकारक केले होते. तर अंतिम वर्ष, अंतिम सत्र पूर्व असलेल्‍या वर्ष, सत्राच्‍या परीक्षा न घेता कामगिरीच्‍या आधारे गुणवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानुसार विविध विद्यापीठांनी निश्‍चित केलेल्‍या गणितीय सुत्रानुसार अंतिम सत्र, अंतीम वर्ष वगळता अन्‍य परीक्षांचे निकाल जाहीर केले होती. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षा घेणे आवश्‍यक असल्‍याने, महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या निर्णयाकडे लक्ष लागून होते. 

अन्‍य सात अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा होणार

नुकतेच विद्यापीठाने कार्यालयीन पत्र जारी करून उन्‍हाळी सत्र २०२० च्‍या परीक्षांच्‍या संभाव्‍य वेळापत्रकाची घोषणा केलेली आहे. दोन टप्प्यांमध्ये या परीक्षा पार पडणार आहेत. यांपैकी पहिल्‍या टप्‍प्यातील परीक्षा २६ ऑक्‍टोबर ते ९ नोव्‍हेंबर या कालावधीत पार पडेल. या दरम्‍यान जुन्‍या अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्‍या परीक्षांसह अन्‍य विविध सात अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा होणार आहेत. यात पदवी पदव्‍युत्तर पदवी व पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. 

दुसरा टप्‍पा नोव्‍हेंबर अखेरीस 

या नियोजनानुसार दुसऱ्या टप्‍प्यात बहुतांश अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा घेतल्‍या जातील. लेखी परीक्षेचा हा टप्पा २१ नोव्‍हेंबर ते १४ डिसेंबर दरम्‍यान पार पडेल. या कालावधीत दंतशास्‍त्रातील विविध वर्ष, आयुर्वेदशास्‍त्रातील बीएएमएस, युनानीतील बीयुएमएस, होमिओपॅथीचे बीएचएमएच यांसह एमबीए (हेल्‍थ केअर ॲडमिनिस्‍ट्रेशन), फिजिओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, स्‍पीच थेरपी, बी.एस्सी. (नर्सिंग)आदी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा पार पडतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT