Onion News esakal
नाशिक

Nashik Onion Trader : कांदा व्यापाऱ्यांची उद्या बैठक; निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Trader : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यावर आता पुढील भूमिका ठरविण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २९) जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची बैठक बोलावली आहे. (Meeting of onion traders tomorrow nashik news)

बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले, तरी नाशिकमध्ये ही बैठक होण्याची शक्यता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी व्यक्त केली. कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटविण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.

याविषयी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. २६) मुंबईत नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

यानंतर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर बैठक घेतली. पण, व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतला नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलाव अजूनही बंद आहेत. याविषयी पुढील निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी व्यापाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT