Message of cleanliness from Nashik Plugers
Message of cleanliness from Nashik Plugers Sakal
नाशिक

नाशिक प्लॉगर्सतर्फे स्वच्छतेचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - शहरातील युवकांनी एकत्र येत कचऱ्याचा प्रश्‍न सोडविताना ‘स्‍वच्‍छ, सुंदर व हरित नाशिक’, अशी ओळख निर्माण करण्यासाठी नाशिक प्‍लॉगर्स कार्यरत आहे. या समूहातर्फे दर शनिवारी व रविवारी सकाळी स्‍वच्‍छता मोहीम राबविली जाते. पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (ता. ५) जनजागृती करून स्‍वच्‍छतेचा संदेश देण्यात आला. नाशिक प्‍लॉगर्सने आतापर्यंत सुमारे दीडशे स्वच्छता मोहीम राबविल्‍या आहेत. महापालिका आणि शहरातील विविध सामाजिक संस्थांना वेळोवेळी सहभागी करत कचऱ्याच्या प्रश्नाला घेऊन जनचळवळ उभी केली आहे.

रविवारी नाशिक प्लॉगर्सने पर्यावरण दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्लॉगॅथॉन या नावाने प्लॉगिंग म्हणजे जॉगींग करत स्वच्छता करण्यासाठी नाशिक प्लॉगर्सच्या स्वयंसेवकांची एक स्पर्धा घेण्यात आली. सहभागी स्वयंसेवकांचे पाच गट करण्यात आले. पाचही गटांनी मिळून ७७ मोठ्या पिशव्या भरून प्लॅस्टिक कचरा गोळा केला. विजयी गटातील स्वयंसेवकांना सीड ट्रे, कोकोपीट आणि भारतीय वाणाच्या बिया देण्यात आल्या.

स्पर्धेनंतर नव्याने जोडलेल्या स्वयंसेवकांनी अनुभव कथन केले. यावेळी हिरवांकुर फाउंडेशनचे श्री. शहाजी यांनी आपल्या संस्थेमार्फत शहरात राबविल्या जाणारी बालक पालक योजनेबद्दल माहिती दिली. नमामि गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल माहिती दिली. ब्रह्मगिरी आणि गोदावरी पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल त्‍यांनी माहिती दिली. चंद्रकिशोर पाटील यांनी अनुभव कथन केले. शहरात कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी एक शिट्टी काय कमाल करू शकते, याबद्दल स्वयंसेवकांना त्‍यांनी मार्गदर्शन केले.

वॉटरग्रेस संस्थेचे तसेच महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. नाशिक प्लॉगर्सचे तेजस तलवारे म्‍हणाले, की अस्‍वच्‍छतेबाबत सोशल मीडियावर केवळ सरकार आणि प्रशासनाला दोष न देता, स्‍वतःच्‍या सवयी बदलण्याची गरज आहे. युवा पिढीने प्रशासन आणि इतर संस्थांसोबत काम करून आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

SCROLL FOR NEXT