MET Knowledge City esakal
नाशिक

Nashik Job fair News: भुजबळ नॉलेज सिटीत शुक्रवारी रोजगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Job fair News : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एमईटी भुजबळ नॉलेज सिटी यांच्यातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

शुक्रवारी (ता. १३) सकाळी दहाला आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे मेळावा होणार असल्‍याची माहिती विभागाच्‍या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली आहे. (MET Knowledge City will have job fair on Friday Nashik News)

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/46cytRB या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.

तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्तपदांसाठी अर्ज करता येतील.

रोजगार मेळाव्यात ३३ पेक्षा अधिक नामांकित कंपन्या, नियोक्ते उपस्थित राहणार आहेत. तीन हजार ७०० हून अधिक पदांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळांचे स्टॉल्स उपलब्‍ध असतील. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ई- मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

रोजगार मेळाव्यात अधिकाधिक नियोक्ते, बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती तडवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

SCROLL FOR NEXT