mhasrul nashiks Ruhi Deshmukh in America Became a researcher  
नाशिक

म्हसरूळची रुही देशमुख अमेरिकेत बनली संशोधक

आघाडीच्या इंटेलिया कंपनीमध्ये निवड

सकाळ वृत्तसेवा

म्हसरूळ : येथील रहिवासी रुही देशमुख या विद्यार्थिनीची अमेरिकेतील आघाडीच्या इंटेलीया कंपनीमध्ये सिनिअर रिसर्च असोसिएट’ म्हणून निवड झाली असून, ‘इम्युनॉलॉजी’ या विषयावर ती संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे जगातील मोजक्याच विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी निवड केली जाते, त्या ठिकाणी नाशिकमधील म्हसरूळच्या विद्यार्थिनीची निवड झाल्यामुळे तिचे व देशमुख कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रुहीच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दिंडोरी रोडवरील परीक्षित हॅास्पिटलचे संचालक डॉ. सतीश देशमुख यांची रुही ही कन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील रासबिहारी हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी महाविद्यालयात झाले आहे. पुढील शिक्षण मुंबईतील जयहिंद कॅालेजला झाले. त्यापुढील एम. एस. बायोटेक्नॅालॅाजीचे शिक्षण तिने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पूर्ण केले आहे. तिने अत्यंत यशस्वीरीत्या आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपली निवड सार्थ ठरवली.

आता जेथे जगातील मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते, अशा ठिकाणी तिची निवड झाली आहे. रुहीच्या निवडीमुळे नाशिकमधील म्हसरूळचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे. तिच्या या निवडीबद्दल म्हसरूळ परिसरात आनंद व्यक्त केला जात असून, सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुटुंबीय व शिक्षक, गुरुजन यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असून, यापुढील वाटचालीतही सर्वांचे आशीर्वाद कायम राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत संशोधनात नेहमी अग्रेसर राहण्याचा विश्वास रुही हिने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बैठकीला गैरहजर राहणं म्हणजे पक्ष सोडणं नव्हे? ठाकरे गटाला मोठा धक्का? शिंदे गटाच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद

Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 12 वर्षांनंतर पेन्शन वाढणार? दिल्लीत महत्त्वाची बैठक

समरचा अ‍ॅक्शन अवतार पाहून स्वानंदी घायाळ! गुंडाशी दोन हात करणार, veen doghatli hi tutena चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

India WTC Final Qualification Scenario : भारताला न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० ने जिंकणं, का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठीचे समीकरण

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांना डिसेंबरअखेर मेट्रो प्रवासाची भेट मिळणार

SCROLL FOR NEXT