earth quake at near gujrat border esakal
नाशिक

Earth Quake : गुजरात सीमावर्ती भागात चोवीस तासात 3 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के

रतन चौधरी

सुरगाणा (जि. नाशिक) : गुजरात सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले.

तहसिलदार सचिन मुळीक यांनी भेट देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. (Mild earthquake tremors 3 times in 24 hours in Gujarat border area nashik news)

तुर्कस्तान देशामध्ये झालेल्या भूकंपाची घटना ताजी असतांनाच क्षणार्धात झालेला विध्वंस व जिवित हानी दुरदर्शन व सोशल मीडियावर पाहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील सीमावर्ती भागातील रघतविहीर, फणसपाडा, राशा या गावात ता. १८ रोजी पहाटे २ वाजून २७ मिनिट यावेळी अर्धा मिनिटभर भूकंपाचा धक्का जाणवला तर दुसरा धक्का त्याच दिवशी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी जाणवला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ता. १९ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान फायर उडविल्या सारखा जोरात आवाज आला, अर्धा मिनिटभर चक्कर आल्यासारखे व गरगरल्या सारखे झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मांडणी वरील ठेवलेल्या भांड्याचा आवाज गावभर आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे बसत असल्याचे गावात अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. असे आवाज नेहमीच गावात येतात.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

काही वेळा घर हलले सारखा भास झाला होतो.याबाबत नेमके काय हा प्रकार आहे याबाबत शासनाने चौकशी करुन नेमके भूकंपाचे हादरे आहे की दुसरं काही याबाबतीत तपास यंत्रणा राबविण्यात यावी अशी मागणी फणसपाडा,रघतविहीर,राशा ग्रामस्थांनी केली आहे.

तहसिलदार सचिन मुळीक यांनी राशा येथे भेट देऊन पाहणी करीत ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. यावेळी रघुनाथ जोपळे, शिवाजी गावित, पांडू बागुल, पांडू सालकर तलाठी चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, असे आवाज अनेक वेळा गुजरात मधील अंकलास, घोडमाळ, सिदुंबर,निरपन, दमणगंगा डॅम, वांसदा जवळील झुजू डॅम या भागात येत असतात. आज झालेल्या आवाजाची तीव्रता भूगर्भातून अधिक जाणवली. काही वेळा बार झाल्यासारखा आवाज येतो, मांडणी वरील भांड्याचा आवाज येतो. जमीनीतून आवाज आल्याचे जाणवते.

अचानक आवाज झाला तर माणूस दचकून उठतो बाहेर निघून बघितले तर काहींच दिसत नाही. सर्व ग्रामस्थामद्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्रामस्थ सकाळी एकमेकांशी चर्चा करतात. नेहमीप्रमाणे कामाला लागतात.

मात्र नेमका हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने करावी अशी मागणी रघतविहीर येथील महेंद्र सहारे, हिरामण सहारे, धनाजी सहारे, शिवराम सहारे,

शांताबाई सहारे, जिजाबाई सहारे, पारुबाई सहारे, उंबरठाण येथील माधव पवार, सुरेश चौधरी, फणसपाडा येथील नामदेव सहारे, गुलाब पवार, काशिनाथ भोये, पुन्या भोये, उमेश सहारे, धनराज सहारे, अजय सहारे, माधव सहारे, यांनी केली जाते आहे.

"तालुक्यातील सीमावर्ती भागातील रघतविहीर जवळील गुजरात मधील निरपन तर महाराष्ट्रातील उंबरठाण या गावात साधारणपणे १९८० रोजी गुजरात शासनाने केंद्र सरकार मार्फत तीस ते पस्तीस वर्षापूर्वी भूकंप मापक यंत्रणा बसविण्यात आली होती.

या केंद्रात दिनकर जाधव, भाऊराव जाधव, याकुब शेख, रमेश चौधरी, नारायण गायकवाड यांनी काम बघितले होते. हे भूकंप मापक यंत्रणा दहा ते बारा वर्षे कार्यान्वित होती. या भूकंप मापक यंत्रावर एक ते चार रिश्टर स्केलची नोंद होत असे.

त्यावेळी चार रिश्टर स्केल पेक्षा मोठी नोंद झाली नव्हती अशी माहिती उंबरठाण येथील दिनकर जाधव या तत्कालीन कर्मचा-याने ' सकाळ प्रतिनिधी शी बोलतांना दिली. भूकंप मापक यंत्रणा बंद झाल्यावर त्यांना गुजरात राज्यातील लघु पाटबंधारे विभागात समावेश करण्यात आला होता."

-दिनकर जाधव, तत्कालीन भूकंप मापक यंत्रणा कर्मचारी उंबरठाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT