Minister Aditya Thackeray sakal
नाशिक

मंत्री आदित्‍य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या बोटक्‍लबला भेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पर्यटन तथा पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (ता. २७) रात्री उशिरा ते नाशिकला दाखल होणार आहेत. शुक्रवारी (ता. २८) पाहणी दौऱ्यासह आढावा बैठकी घेणार आहेत. ते उंटवाडी परिसरातील म्‍हसोबा मंदिराला भेट देऊन दोनशे वर्षे जुन्‍या वटवृक्षाची पाहणी करणार आहेत.?(Minister Aditya Thackeray News)

जिल्‍हा प्रशासनाला मंत्री ठाकरे यांचा दौरा प्राप्त झाला आहे. त्‍यानुसार गुरुवारी (ता. २७) मंत्री आदित्‍य ठाकरे औरंगाबाद येथून वाहनाने नाशिकमध्ये दाखल होतील. रात्री उशिरा नाशिकला आल्‍यानंतर ते मुक्‍कामी असतील. शुक्रवारी (ता. २८) सकाळी ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या बोटक्‍लबला भेट देतील. दुपारी बाराला शेंद्रेपाडा व सावरपाडा येथील आदिवासी पाड्यांना ते भेट देणार आहेत.

दुपारी साडेतीनच्‍या सुमारास सिटी सेंटर मॉल परिसरातील म्‍हसोबा महाराज मंदिराला भेट देत दोनशे वर्षे जुन्‍या वटवृक्षाची पाहणी करतील. नंतर विभागीय आयुक्‍त कार्यालयात विविध विषयांवर बैठका घेणार आहेत. नाशिक जिल्‍ह्यातील पर्यटनविषयक आढावा ते घेतील. नाशिक विभागातील ‘माझी वसुंधरा अभियाना’ची आढावा बैठक होईल. सायंकाळी पावणेसहाच्‍या सुमारास ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. नंतर सर्व कार्यक्रम आटोपून ते रात्री मुंबईकडे रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सब गोलमाल! पत्नी IPS, पती IAS, कुटुंबाच्या नावे ४० व्हिलांची खरेदी, भाडं वर्षाला २ कोटी; सरकारने केली कारवाई

महाडमध्ये दर मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, एमआयडीसी प्रशासनाचा मोठा निर्णय; कोणत्या भागांना फटका?

Money Tips: शॉपिंग अन् खर्चाची घाई नको! पहिल्या पगारातून नेमकं काय करायचं?

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT