bacchu kadu esakal
नाशिक

बच्चू कडू माफी मागा, नाहीतर आत्मदहन; सुवर्णकार समाजाचा इशारा

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : ‘कोण लग्न रोखतो ते मी पाहतो. मी लग्नात येऊन नाचणार,’ असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले होते. आंतरधर्मीय विवाह प्रकरणी बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एका पदाधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच सुवर्णकार समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. सुवर्णकार समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल ३० जुलैच्या आत कडू यांनी जाहीर माफी न मागितल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गजू घोडके यांनी दिला आहे. समाजाचे समाधान होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील. महाराष्ट्रातील समाजबांधवांनी काळ्या फिती लावून कडू यांचा निषेध करावा, असे आवाहनही गजू घोडके यांनी केले आहे. (Minister-bacchu-Kadu-should-apologize-demands-suvarnakar-samaj-jpd93)

कडू यांच्यामुळेच ते लग्न करण्याचे कुटुंबाला बळ मिळाले - सुवर्णकार समाज

‘कोण लग्न रोखतो ते मी पाहतो. मी लग्नात येऊन नाचणार,’ असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले होते. जणू काही संपूर्ण समाजाचे ते बाप आहेत, असाच आव त्यांनी आणला होता. समाजावर होणाऱ्या चांगल्या-वाईटाचा विचार न करता एकतर्फी निकाल देणे कितपत योग्य आहे, असा सवालही गजू घोडके यांनी केला आहे. मुलीच्या वडिलांना आम्ही समजावून सांगिल्यानंतर त्यांनी सुरवातीला लग्न व स्वागत सोहळा रद्द करण्याचे अभिवचन दिले होते. मात्र, कडू यांच्यामुळे त्यांना बळ मिळाले आणि समाजाचा विचार न करता त्यांनी २२ जुलैला लग्नाचा स्वागत सोहळा उरकून घेऊन आमचा विश्वासघात केला. आमचा लग्नाला विरोध नव्हताच. समाजातील कुणी मुलगा माझ्या मुलीशी लग्न करण्यास तयार नव्हता, अशा मुलीच्या वडिलांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. मुलगी गतिमंद होती तरी तिच्यासाठी समाजाची १०० मुले दाखविली असती, असा दावाही घोडके यांनी केला. कडू यांच्यानंतर शिक्षकभारतीचे आमदार कपिल पाटील मुलीच्या वडिलांची भेट घेऊन गेले. त्यांचेही समर्थन असल्याचेच यावरून निदर्शनास येते. कडू यांच्याप्रमाणेच आमदार पाटील यांनीही सुवर्णकार समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही घोडके यांनी केली. आम्ही व्यापारी माणसे आहोत. मात्र, समाजाविरुद्ध कुणी वक्तव्य करणार असतील, तर राज्यव्यापी बंद पुकारून आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावी लागेल, असा इशाराही घोडके यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT