Dada Bhuse Viral Video esakal
नाशिक

Dada Bhuse Viral Video: मंत्री दादा भुसेंनी सिनेस्टाईल पकडला पिकअप, समोर आला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse Viral Video : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनाला कट मारून पळणाऱ्या वाहनाचा दादा भुसे यांनी सिनेस्टाइल पाठलाग करत पकडले. पिकअप वाहन चालकाला पकडल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली.

कारण या वाहनातून अवैध गोवंश वाहतूक करण्यात येत होती. या संदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Minister Dada Bhuse grabs Cinestyle pickup comes out shocking video went viral nashik news)

याबाबत अधिक माहिती अशी की, पालकमंत्री दादा भुसे हे महामार्गावरून मालेगावकडे जात होते. यावेळी एका भरधाव जाणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांचा ताफ्यातील वाहनाला कट मारला. यानंतर पळण्याचा प्रयत्न केला.

दादा भुसे यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले. यानंतर पळून जाणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू झाला. आणि काही अंतरावर सदर पिकअप चालकाला पकडण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

हे वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी त्या वाहन चालकाची चांगलीच कान उघडणी केली.

यान संदर्भातील व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा अवैध गोवंश वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. यातच या वाहनाने थेट मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारल्याने हा अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT