uday samant
uday samant esakal
नाशिक

महाविद्यालये सुरू होणार, पण 'ही' असेल अट : उदय सामंत

महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला कोरोना प्रतिबंधक लशीचे (corona third wave) दोन डोस झाल्यावर महाविद्यालयांचे वर्ग सुरू करता येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता. ३०) येथे दिली. तसेच अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालय शुल्कासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. निमित्त होते, ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्याचे. (minister-uday-samant-talking-about-Colleges-start-jpd93)

उदय सामंत : समितीच्या अहवालानंतर शुल्क कमी करण्याचा होईल निर्णय

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यश-इन’ सभागृहात प्रतिअधिवेशनाच्या कामकाजाला सकाळपासून सुरवात झाली. कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत सामंत यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरवात झाली. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, आमदार सरोज आहिरे, आमदार सुहास कांदे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे उपस्थित होते. या वेळी ‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटमधील मुख्यमंत्री अजय खांडबहाले, उपमुख्यमंत्री विशाल पाटील, आरोग्यमंत्री आकाश हिरवळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्रवीण कोळपे, नगरचे अनिकेत कुलकर्णी यांनी राज्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये असलेले प्रश्‍न विचारले. त्यांना श्री. सामंत यांनी उत्तरे दिली. प्रश्‍नोत्तरे अशी :

(यिन शॅडो कॅबिनेटचे मुख्यमंत्री अजय खांडबहाले) : ऑनलाइन शिक्षणामुळे महाविद्यालयांच्या खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे शुल्कात पन्नास टक्के कपात करावी. दुष्काळग्रस्त, कोरोनाग्रस्त, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे. दोन एकरांच्या आतील शेतकऱ्यांच्या पाल्यांची फी माफ करावी. याबद्दल सरकारची भूमिका काय?

उदय सामंत : कोरोनाबाधित पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले आहे. विद्यापीठांनी जिमखाना शुल्क माफ केले आहे. ग्रंथालय आणि प्रयोगशाळा शुल्कात ५० टक्के शुल्क माफ करण्यात आले आहे. याशिवाय पूरस्थितीमुळे अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्यासाठी पुढील महिन्यात परीक्षा घेण्यात येतील. पुणे, मुंबई, गडचिरोलीमध्ये स्टुडिओची उभारणी करत व्हर्च्युअल शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याचे अधिकार विद्यापीठांना देण्यात आले आहेत.

प्रश्‍न (यिन शॅडो कॅबिनेटचे उपमुख्यमंत्री विशाल पाटील) : महाविद्यालयीन निवडणुकांवरील बंदी उठवणार का?

उदय सामंत : महाविद्यालयीन निवडणुकांसंबंधी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासंबंधाने निर्णय घेतील. पण, कोरोनामुळे लगेच निर्णय होऊ शकत नाही. विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी मागणी केल्यास त्यासंबंधीचा विचार होईल. मात्र, निवडणुकांमध्ये वाईट प्रकार घडणार असल्यास त्या न होणे योग्य आहे.

प्रश्‍न (यिन शॅडो कॅबिनेटचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्रवीण कोळपे) ः ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचा संवाद तुटला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील वर्ग सुरू कधी होतील?

उदय सामंत : कोरोनामुळे पारंपरिक वर्गपद्धती खंडित झाली. त्यामुळे महाविद्यालय सुरू करायचे आहेत. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या आयुष्याची काळजी घ्यायची आहे. त्यासंबंधाने मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यात ४२ लाख विद्यार्थी असून, त्यातील रोजची ७५ टक्के उपस्थिती म्हटले, तरीही ३५ लाख विद्यार्थी वर्गात येतील. त्यांच्यासोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हेही महाविद्यालयात येतील. त्यातून रोज वर्गांचे सॅनिटायझेशन कसे करायचे? वसतिगृहांचे काय करायचे, असे प्रश्‍न आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लशीचे दोन डोस होणे आवश्‍यक आहे.

प्रश्‍न (यिन शॅडो कॅबिनेटचे आरोग्यमंत्री आकाश हिरवळे) : राज्यात विभागनिहाय फार्मसी कॉलेज सुरू करण्यात येणार काय?

उदय सामंत : रत्नागिरीमध्ये सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत आहे. सर्वेक्षण करून राज्यात सरकारी फार्मसी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

प्रश्‍न (यिनचे नगरमधील प्रतिनिधी अनिकेत कुलकर्णी) : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणार काय?

उदय सामंत : अभियांत्रिकीचे १६ हजार २५० रुपये शुल्क कमी केले आहे. याव्यतिरिक्त शुल्कासंबंधी स्थापन केलेल्या समितीला पंधरा दिवसांचा कालावधी दिला आहे. समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT