raped by facebook friend.jpg 
नाशिक

'तुझं माझ्यावर प्रेम असेल, तर तुला हे करावंच लागेल!'...अन् त्याने...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिडको) फेसबुकच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिला प्रेमाच्या शपथा देत वेळोवेळी मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर त्याने अत्याचार केले. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्याने सगळा प्रकाराचा उलगडा झाला. या बाबतीत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आहे प्रकार

अक्षय हिवाळे (रा. कामटवाडे, रा. अंबड) याने एका अल्पवयीन मुलीशी फेसबुक माध्यमातून ओळख निर्माण केली. तू किती छान दिसते, तू किती गोड आहेस, मला तू खूप आवडते... अशाप्रकारे संबंधित मुलीशी जवळीक करुन, रोज संवाद साधून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटून त्याने लैगिंक अत्याचार केले. तिच्यासोबत असलेली मैत्रीला प्रेमाच्या नावाने तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अक्षय तिला गोडीत  त्याचा मित्र तुषार त्याच्या रूमवर तिला नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. वेळोवेळी करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गर्भवती राहिली. यातून तिच्या घरचांना सगळा उलगडा झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अक्षय याच्याविरोधात भादवि कलम 376 व बाललैंगिक अत्याचार संरक्षण ( पोस्को ) अधिनियम 2012 कलम 4, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

असे प्रकारात दिवसेंदिवस वाढ

सध्या स्थितीत फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप अशा प्रकारचे सोशल मीडियावर हल्ली तरुण-तरुणी एकमेकांशी ओळख करून जवळकी निर्माण करीत आहे. या जवळीकतेतून मैत्री प्रस्थापित झाल्यानंतर त्यातूनच शारीरिक संबंधाचे प्रकार घडत असून त्यामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागते आहे. याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. सोशल मीडियातून झालेली ओळख आपले आयुष्य बिघडू शकते याकडे तरुणाईने डोळसपणे बघितले पाहीजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT