Molestation esakal
नाशिक

Nashik Crime: औरंगपूर येथे अल्पवयीन मुलींची छेडछाड; 11 जणांवर गुन्हा दाखल

संशयितांमध्ये आपचे जिल्हाध्यक्ष उत्तम निरभवणे यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : औरंगपूर येथे शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढल्याने सायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम निरभवणे यांचा समावेश आहे.

त्यांच्यावर कडक कारवाई करावी व गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी. आम आदमी पक्षाने गुन्हेगार प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्याला तत्काळ पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Minor girls molested in Aurangpur case registered against 11 persons Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फिर्यादीची मुलगी आणि इतर तीन मुली औरंगपूर येथून भेंडाळी येथे माध्यमिक शाळेत पायी जात असताना, खंडेराव मंदिरासमोरील टपरीवर बसलेल्या सचिन आढाव याने फिर्यादीच्या मुलीच्या हाताला पकडून तिला आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला.

इतरांनीही खडे मारून मुलींची छेड काढली. सचिन आढाव याने आपण घाबरायचे नाही. आपल्याला काही होणार नाही. आपल्यासोबत उत्तम निरभवणे आहे, असे म्हणत छेड काढली.

या प्रकरणी सचिन आढाव, जयंत चाबुकस्वार, सचिन संतोष आढाव, केतन गायकवाड, महेश गायकवाड, कपिल गायकवाड, मयूर गायकवाड, शिवाजी आढाव, उत्तम निरभवणे, संदीप निरभवणे, अनिल आढाव यांच्याविरुद्ध सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT