misconduct in durga patsanstha aadgaon case has been filed against board of directors misconduct in durga patsanstha aadgaon case has been filed against board of directors
नाशिक

नाशिक : आडगावच्या दुर्गा पतसंस्थेत पावणे ३ कोटींचा गैरव्यवहार

विनोद बेदरकर

नाशिक : पतपेढीत तब्बल पावणे तीन कोटी रूपयांचा आर्थिंक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आडगाव येथील दुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मल्हारी मते याच्यासह संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लेखा परिक्षणात हा गैरव्यवहार समोर आला असून, अनियमीत कर्ज पुरवठा,संस्थेच्या नावाने कर्ज काढून रकमेचा गैरव्यवहार,ठेव रक्कम प्रत्यक्ष देणे, बनावट बचत खात्यातून परस्पर रकमा काढणे आदी आरोप करण्यात आले आहे. लेखापरिक्षक संजय श्यामराव लोळगे यांनी याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान हा गैरव्यवहार झाला आहे. दुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मल्हारी भागूजी मते व अन्य १५, व्यवस्थापक बाजीराव नामदेव कोल्हे व ५ जण, ओशियन बेवरेजेस प्रा.लि.चे चेअरमन बाबुराव विश्वनाथ बगाडे व २९ आणि माजी शाखा व्यवस्थापक भागिरत मते व अन्य ९ जणांनी २ कोटी ७६ लाख १ हजार ४० रूपयांचा घोटाळा केला आहे.


लेखापरिक्षक लोळगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २०१३ ते मार्च २०१५ दरम्यान संशयीतांनी संगनमताने बोगस नावाने बचत खाते उघडून त्यातून रकमा विड्रॉल केल्या आहेत. ठेव रकमा प्रत्यक्ष दिल्या तसेच पतसंस्थेतच संस्थेच्या नावाने कर्ज उचलून कर्ज खात्यातील रकमेचा गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. हा घोटाळा आजी माजी संचालक मंडळ,व्यवस्थापक ते बचत प्रतिनिधी,कर्जदार,ठेविदार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या माध्यमातून झाला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT