pramod patil.jpg 
नाशिक

बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राजीवनगर परिसरात राहणारे व बांधकाम अभियंत्या शनिवारपासून बेपत्ता होते ते...अन् तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सोमवारी (ता. 17) गंगाघाटावरील गांधी तलावावर तरंगताना आढळला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली.

असा आहे प्रकार

प्रमोद परशराम पाटील (वय 40, रा. राजीवनगर, इंदिरानगर) असे त्यांचे नाव असून, इंदिरानगर पोलिसांत शनिवारी (ता. 15) बेपत्ता असल्याची नोंद आहे. पाटील यांनी 
आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रमोद पाटील शनिवारी सायंकाळी मोपेड घेऊन गेले होते. त्यांनी त्यांचा मोबाईलही घरीच ठेवला होता. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केल्यानंतरही ते न सापडल्याने त्यांनी इंदिरानगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. इंदिरानगर पोलिसांना त्यांची मोपेड गंगाघाटावरील एकमुखी दत्तमंदिराजवळ सापडली होती. मात्र, पाटील यांचा परिसरात कोठेही शोध लागला नव्हता. दोन दिवसांनी सोमवारी त्यांचा मृतदेह गांधी तलावात तरंगताना आढळला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली. ते एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला होते, तसेच घरात कोणताही वाद झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Assam victory: ‘चहाच्या मळ्या’त भाजपची ‘हॅट् ट्रिक’; ईशान्येत वर्चस्व, काँग्रेसचे पुनरागमनाचे स्वप्न धुळीला!

Kerala Election Results: केरळमध्ये ‘यूडीएफ’चा दणदणीत विजय; ‘एलडीएफ’चा पराभव, ‘पिनराईवाद’चा अस्त, १० वर्षांची सत्ता संपली!

Washim News: मेडशी वन विभागाच्या डेपोला भीषण आग; लाखो रुपयांची वनसंपत्ती वाचवली; वन कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Akola News: वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव;संशयाचे विष; स्वतःवरही जीवघेणा हल्ला

Nitesh Rane Verdict - महामार्ग अभियंता चिखलफेक प्रकरण : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT